Rohith Vemula 
देश

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

पीएचडी करणाऱ्या या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी याप्रकरणी माजी कुलगुरु आणि भाजपच्या आरोपी नेत्याला क्लीनचीट दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Rohith Vemula Death Case : हैदराबाद विद्यापीठातील दलित वर्गातील पीएचडी स्कॉलर रोहित वेमुला यानं जानेवारी २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. त्याचा मृत्यू हा अॅकेडमिक मर्डर असल्याचे अनेक आरोप त्यावेळी झाले. विद्यापीठीचे तत्कालीन कुलगुरु आणि भाजपच्या नेत्यांचं नाव या प्रकरणात आरोपी म्हणून पुढे आलं होतं.

पण तेलंगाणा पोलिसांनी आता रोहित दलितच नव्हता असा अहवाल देत ही केस बंद केली आहे. तसेच याद्वारे आरोपी माजी कुलगुरु आणि भाजप नेत्यांना क्लीनचीट दिली. (Rohith Vemula was not a Dalit says Police closer report Cleancheat to Smriti Irani Bandaru Dattatreya and others)

पोलिसांच्या तपासात म्हटलं की, रोहित वेमुला यानं आपली खरी जात समोर येईल या भीतीनं आत्महत्या केली आहे. कारण रोहित स्वतःला अनुसुचित जातीचा विद्यार्थी अर्थात दलित असल्याचं सांगत होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी सन २०१५ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून सांगितलं होतं की, हैदराबाद विद्यापीठात कशा पद्धतीनं जातीयवाद, मुलतत्ववाद आणि देशविरोधी राजकारण केलं जातं. या गंभीर आरोपांनी रोहितला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचं बोललं गेलं. (Latest Marathi News)

दरम्यान, पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये हैदराबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू अप्पा राव आणि सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, माजी आमदार एन रामचंदर राव आणि ABVP नेत्यांसह भाजप नेत्यांना दोषमुक्त करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं की, रोहित वेमुला अनुसूचित जाती (एससी) समुदायाशी संबंधित नव्हता. त्याच्या आईनं त्याला एससी प्रमाणपत्र मिळवून दिलं. आपली जात उघड होईल याची सततची भीती रोहितलाह होती. कारण जर रोहितची खरी जात उघड झाली तर त्यामुळं अनेक वर्षांमध्ये मिळवलेल्या आपल्या शैक्षणिक पदव्या गमावल्या लागतील आणि याविरोधात कोर्टात खटला चालेल, याची भीती त्याला होती.

त्याचबरोबर रोहित वेमुला हा अनेक समस्यांनी ग्रस्त होता, त्यामुळं तो नैराश्यात गेल्यानं स्वतःचं जीवन संपवण्याची शक्यता होती. तसेच आरोपींनी केलेल्या कृतींमुळं वेमुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडलेला नाही.

रोहितचा भाऊ पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान

दरम्यान, रोहित वेमुला याचा भाऊ राजा यांनी पोलिसांचे दावे खोडून काढले आहेत. तसेच पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत "पोलिस अधिकारी एखाद्या व्यक्तीची जात ठरवू शकत नाही. आम्ही शनिवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार आहोत. आम्ही कोर्टात याविरोधात निषेध याचिका दाखल करू आणि न्यायासाठी इतर पर्यायांचाही विचार करत आहोत, असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT