rpf soldier ran behind a train to deliver milk for a 4 year old child 
देश

...अन् जवान दुधाची पिशवी घेऊन धावला!

वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश):  जवानाच्या एका हातात रायफल आणि दुसऱया हातात दुधाची पिशवी. जवान धावत सुटला आणि एका भुकेल्या बाळाला दुधाची पिशवी दिली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, रेल्वेमंत्र्यांनी जवानाचे कौतुक करत पुरस्काराची घोषणा केली.

इंदर सिंह यादव असे जवानाचे नाव आहे. यादव हे भोपाळ रेल्वे स्टेशनवर सेवा बजावत होते. यावेळी श्रमिक रेल्वेमधून साफिया हाश्मी या आपल्या चार महिन्यांच्या बाळासह प्रवास करत होत्या. साफिया यांनी यादव यांच्याकडे बाळासाठी दुधाची विनंती केली. यादव हे रेल्वे स्टेशनबाहेर दुध आणण्यासाठी गेले. पण, दुध घेऊन आल्यानंतर रेल्वे सुटली होती. यावेळी यादव बाळापर्यंत दूध पोहचविण्यासाठी धावत्या रेल्वेमागे धावत सुटले आणि दुधाची पिशवी दिली. संबंधित फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

यादव म्हणाले की, 'साफिया यांनी सांगितले की बाळासाठी बेळगावपासून दुधाची मागणी करत आहे. पण, दुध मिळाले नाही. त्याच्या विनंतीनंतर दुध आणण्यासाठी गेलो. पण, मला विश्वास होता की बाळसाठी वेळेत दुध पोहचवणार म्हणून आणि पोहचवले.' दरम्यान, यादव यांचा व्हिडिओ व्हारल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी जवानाचे कौतूक करत रोख पुरस्काराची घोषणा केली आहे. बाळाच्या आईने देखील यादव यांचे आभार मानताना त्यांना खरे हिरो म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT