pinarayi vijayan AND RSS 
देश

Pinarayi Vijayan : RSS अल्पसंख्यांकांना देशाचे शत्रू मानतं; केरळच्या CMचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

तिरुअनंतपुरम: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुस्लिम आणि ख्रिश्चनांना 'देशाचे शत्रू' मानत असल्याचा आरोप केला. तसेच जातीय भेदभाव आणि धार्मिक द्वेष पसरविणाऱ्यांविरोधात एकत्र यावं, अस आवाहनही विजयन यांनी केलं.

दुसरीकडे विजयन यांच्या या विधानावर भाजपने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विजनय म्हणाले की, जातीय भेदभाव आणि धार्मिक द्वेषाविरुद्ध लढण्यासाठी संविधान हे सर्वोत्तम शस्त्र आहे. मात्र संविधानावरच आता हल्ला होतोय, असंही ते म्हणाले.

भारताला हिंदु राष्ट्र बनविणे हे आपले उद्दिष्ट असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आधीच स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रातील सत्ताधारी पक्ष जी विचारधारा मानतो, त्या विचारधारेचा स्वातंत्र्यलढ्यात काहीही सहभागी नव्हता, असंही विजयन यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदींवरील गुजरात दंगलीवरील बीबीसीची वादग्रस्त डॉक्युमेंटरी डाव्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सह विविध राजकीय संघटनांनी केरळमध्ये दाखवली आहे. याचा भाजपच्या युवा मोर्चाने निषेध केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी यांनी या माहितीपटाच्या प्रदर्शनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याने भाजपला अनपेक्षितपणे अनेक स्तरातून पाठिंबा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT