राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते रतन शारदा यांनी RSS मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये एक लेख लिहिला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्यानंतर या लेखावर प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाने ‘ऑर्गनायझर’मध्ये लिहण्यात आलेल्या लेखाशी राष्ट्रवादी सहमत नसून भाजपचे नेतृत्व देखील या लेखात लिहलेल्या भूमिकेशी सहमत असणार नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर रतन शारदा यांनी गुरुवारी बोलताना सांगितले की, शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या लेखाचे कौतुक केले आहे.
रतन शारदा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, "भाजप आणि आरएसएसच्या अनेक नेत्यांनी मला संदेश पाठवले आहेत. मी जे लिहिले आहे त्याच्याशी ते सहमत आहेत. यावरून या दोघांमध्ये फरक असल्याचे दिसून येते. सुधारणा करण्यासाठी आणि पुनरागमन करण्यासाठी भाजपने ओळखली जाते. सकारात्मक दृष्टिकोनातून मी हा लेख लिहला आहे."
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युती आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलताना शारदा यांनी आपल्या लेखात म्हटलं होतं की, 'अनावश्यक राजकारण आणि टाळता येण्याजोगे हेराफेरीचं हे उत्तम उदाहरण आहे.'
राष्ट्रवादीसोबत ही युती का झाली, असे विचारले असता शारदा म्हणाले, “सामान्य लोक रस्त्यावर उतरून हेच विचारत आहेत. महाराष्ट्रात सरकार सुरक्षित होते, बहुमतात होते, मग का? अजित पवार चांगले नेते आहेत, पण मतांचे हस्तांतरण झाले नाही.
शारदा यांनी आपल्या लेखात स्थानिक नेत्यांकडे कसे दुर्लक्ष केले गेले आणि निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने उमेदवार आणले गेले, अशी टीका केली. मोदींच्या नावावर प्रत्येक जागा जिंकता येते... या कल्पनेलाही मर्यादित महत्त्व आहे.
त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, "पक्ष बदल केलेल्यांनी 69 पैकी 25 टक्के जागा लढवत होते, त्यापैकी त्यांचा पराभव झाला. त्यांचा पराभव कोणी केला? जनतेने त्यांचा पराभव केला. त्यामुळे उमेदवार म्हणून कोणाला उमेदवारी दिली जाते, हेही महत्त्वाचे आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.