RSS News  esakal
देश

RSS News : ''दोन-तीन नव्हे तर चार मुलं पाहिजेत'', आरएसएसच्या नेत्याचं वादग्रस्त विधान; म्हणाले...

सतीश कुमार पुढे म्हणाले की, २०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित देश बनेल तेव्हा आपल्याला युवकांची हाती तो विकसित देश द्यावा लागेल. आपलं कुटुंब छोटं नव्हे तर मोठं असलं पाहिजे. मी या गोष्टीची वकिली करीत नाही की, पाच-सहा मुलं पैदा करा. परंतु दोन किंवा तीन मुलं नक्कीच पाहिजेत.. चार मुलं असणंसुद्धा चांगली गोष्ट आहे.

संतोष कानडे

RSS on Population : सातत्याने होणाऱ्या विधानांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या चर्चेत आहे. आता आणखी एक विधान संघाच्या नेत्याकडून झाल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरएसएसचे प्रचारक सतीश कुमार यांनी मुलं जन्माला घालण्याबाबत विधान केलं आहे.

सतीश कुमार म्हणाले की, लोकांनी जास्त मुलं जन्माला घातले पाहिजेत. त्यांनी मोठ्या कुटुंबाद्दलही विधान केलं आहे. देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत चर्चा सुरु असताना कुमार यांच्या वक्तव्य पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये स्वदेशी जागरण मंचाचे सहसंघटक सतीश कुमार यांनी वरील विधान केलं. ते म्हणाले की, संशोधनानुसार ज्या देशांमध्ये युवकांची संख्या कमी आहे, तिथे जीडीपी घसरत चालला आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये युवकांची संख्या जास्त पाहिजे.

सतीश कुमार पुढे म्हणाले की, २०४७ मध्ये जेव्हा भारत विकसित देश बनेल तेव्हा आपल्याला युवकांची हाती तो विकसित देश द्यावा लागेल. आपलं कुटुंब छोटं नव्हे तर मोठं असलं पाहिजे. मी या गोष्टीची वकिली करीत नाही की, पाच-सहा मुलं पैदा करा. परंतु दोन किंवा तीन मुलं नक्कीच पाहिजेत.. चार मुलं असणंसुद्धा चांगली गोष्ट आहे.

आपलं हे म्हणणं संशोधनाच्या आधारावर असून स्वदेशी संस्थेने चार मुलं असण्यावर अभ्यास केला असल्याचं सतीश कुमार म्हणाले. २०४७ मध्ये आपल्याला म्हताऱ्यांचा देश व्हायचं नाही. आपली लोकसंख्या ही युवा असली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT