Mohan Bhagvat 
देश

RSS On Caste based Census: जातनिहाय जनगणनेला RSSचा पाठिंबा? नव्या भूमिकेमुळं संभ्रम

संघाच्या विदर्भ प्रांताचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी नुकताच जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध असल्याचं म्हटलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जातनिहाय जनगणनेचा विषय देशभरात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी संघाच्या विदर्भ प्रांताचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी आपलं मत व्यक्त करताना जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध आहे, असं म्हटलं होतं.

पण आता संघाच्या प्रवक्त्यांकडून नव्यानं जाहीर केलेल्या निवेदनानुसार संघानं जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं नाही, तर केवळ त्याचा कुठल्याही राजकीय पक्षांनी गैरवापर करु नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळं संघाच्या जातनिहाय जनगणनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (RSS role on Caste based Census is made confusion over new statement by Sunil Ambekar)

संघानं नेमकं काय म्हटलंय?

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकारच्या भेदभाव आणि विषमतामुक्त समरसता आणि सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाच्या धेय समोर ठेऊन सातत्यानं कार्यरत आहे. (Marathi Tajya Batmya)

हे सत्य आहे की विविध ऐतिहासिक कारणांमुळं समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक आणि शिक्षणिकदृष्ट मागास राहिले आहेत. त्यांच्या विकास, उत्थान आणि सशक्तीकरणासाठी विविध सरकारनं वेळोवेळी अनेक योजना आणि प्रावधान करतात. ज्याचं संघ पूर्ण समर्थन करतो.

गेल्या काही दिवसांपासून जातनिहाय जनगणनेची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आमचं हे मत आहे की, याचा उपयोग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व्हावा. तसेच हे करताना सर्व पक्षांनी हे सुनिश्चित केलं पाहिजे की कोणत्याही कारणानं सामाजिक समरसता आणि एकात्मता खंडीत होता कामा नये.

संघाचा जातनिहाय जनगणनेला पाठिंबा?

खुद्द संघाच्या प्रचार प्रमुखांनी हे निवेदन प्रसिद्ध केल्यानं यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कुठेही संघटनेचा जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचं म्हटलेलं नाही उलट याचा उपयोग समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व्हावा पण हे करत असताना समाजातील एकात्मता खंडीत होता कामा नये असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

काल केला होता विरोध

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी नुकतीच जातनिहाय जनगणनेवर प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, "जातिव्यवस्था भारताच्या प्रगतीमध्ये अडथळा आहे. ती कालबाह्य व्हावी असं एकीकडं आपण म्हणतो. तर दुसरीकडं जातीच्या आधारावर गणना करतो.

यामुळं आमच्या समाजाचे लोक कमी आहेत, तर दुसऱ्या समाजाचे लोक अधिक आहेत, अशी भावना निर्माण होऊन लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचा राजकीयदृष्ट्या कुणाला लाभ होत असला, तरी ही बाब भारताच्या एकतेच्या दृष्टीनं योग्य नाही. त्यामुळं जातनिहाय जनगणनेला रा. स्व. संघाचा विरोध आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT