RSS esakal
देश

यापुढं RSS कोणत्याही मंदिर-मशीद वादात उतरणार नाही; संघ परिवाराचं सूचक विधान

सकाळ डिजिटल टीम

ज्ञानवापी मशिदीच्या वादावर संघ परिवाराच्या बाजूनं सूचक व महत्वाचं विधान आलंय.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बनारसमधील (वाराणसी) ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून (Gyanvapi Masjid Survey) देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या वादावर संघ परिवाराच्या (RSS) बाजूनं सूचक व महत्वाचं विधान आलंय. ‘ज्ञानवापी तसेच यापुढील कोणत्याही मंदिर-मशीद वादात किंवा आंदोलनात संघ अथवा संघपरिवार थेटपणे उतरणार नाही, असं वरिष्ठ संघ सूत्रांनी आज अनौपचारीकरित्या बोलताना सांगितलंय.

पुढील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर 'काशी मथुरा बाकी है' हा पुढील अध्याय सुरू झाल्याचं वातावरण आहे, त्या पार्श्वभूमीवर थेट संघाच्या बाजूनं आलेलं हे विधान महत्वाचं मानलं जातंय. रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल गेल्या वर्षी आला. त्यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांनी दिलीत काही पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, रामजन्मभूमी आंदोलनातील एका विशिष्ट स्थितीत संघ दिवंगत सरसंघचालक बाळासाहेब देवरस (Balasaheb Devaras) यांच्या काळापासून सक्रियपणे उतरला होता. मात्र, यापुढं मंदिरांवर मशीद उभारण्याच्या घटनांबाबतच्या आंदोलनात संघ प्रत्यक्षपणे सहभागी होणार नाही. त्याची तशी गरजही उरलेली नसल्याचं ते म्हणाले होते.

दरम्यान, ज्ञानवापी मुद्यावर बरीच चर्चा सुरूय. मात्र, सत्य व तथ्य सर्वांसमोर आले पाहिजे, अशी भूमिका संघनेते सुनील आंबेकर यांनी आज दिल्लीत घेतली. ज्ञानवापी मशिदीतील तळघराच्या खोल्यांत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू संघटनांकडून (Hindu Organization) केला जात आहे, तर ते शिवलिंग नसून मशिदीच्या वजूखान्याला पाणीपुरवठा करण्यासाठी तयार केलेला फवारा आहे, असा दावा मुस्लिम पक्षानं केलाय. त्यामुळं ज्ञानवापी मुद्यावर स्पष्ट निकाल कधी समोर येतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT