चेन्नई - रशिया आणि युक्रेनमधील (Russia and Ukraine war) संघर्षाचा आयात- निर्यात व्यापारावर विपरीत परिणाम होणार असल्याच्या भीतीने भारत सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala sitharaman) यांनी ही भीती बोलून दाखविली आहे. आज त्या येथे आयोजित उद्योजकांच्या मेळाव्यात बोलत होत्या. सीतारामन म्हणाल्या की, ''केंद्र सरकारने (central government) या सगळ्या आव्हानांचा गांभीर्याने विचार केला असून मंत्रालयीन पातळीवर देखील उपाययोजना आखल्या जात आहेत. रशिया युक्रेन संघर्षाबाबत भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये घेतलेली भूमिका आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात येणाऱ्या निवेदनांचाही अभ्यास केला जात आहे. या संघर्षामुळे रशिया आणि युद्धग्रस्त युक्रेनशी होणारा आयात- निर्यात व्यापार (Import-export trading) प्रभावित होण्याचा धोका असून त्यामुळे आम्ही चिंतित आहोत.''
निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की,''साधारणपणे पहिला फटका हा युक्रेनशी होणाऱ्या आयात- निर्यातीला बसेल. ज्या गोष्टी त्या देशातून आमच्याकडे येत होत्या त्याबाबत तर चिंता आहेच पण सध्या चांगली कामगिरी करणाऱ्या क्षेत्रांना देखील याचा मोठा फटका बसू शकतो. विशेषतः शेती उद्योग. परिस्थितीचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आणि विविध मंत्रालयांची निरीक्षणे पडताळून पाहिल्यानंतर आम्हाला आमची भूमिका सविस्तरपणे मांडता येईल.'' दरम्यान या संघर्षाचा पहिला फटका हा युक्रेनमधून होणाऱ्या खाद्यतेलाच्या आयातीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बीअर महागणार
या संघर्षामुळे बीअरप्रेमींना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. बड्या कंपन्या बीअरच्या निर्मितीसाठी बार्लीचा वापर करतात. युक्रेन हा बार्लीचा सर्वांत मोठा उत्पादक देश असून आता या युद्धामुळे येथील बार्लीचे सगळे उत्पादनच ठप्प होण्याची भीती वर्तविली जात आहे. दरम्यान बार्लीच्या किमती वाढत असल्या तरीसुद्धा कंपन्या बीअरची किंमत वाढविणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.