ukraine russia dispute sakal
देश

रशिया युक्रेन संभाव्य युद्धात

क्रूड भाववाढीने आगीत तेल ओतले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: रशिया युक्रेनवर आक्रमण करण्याच्या शक्यतेच्या भीतीने आज जगातील सर्वच शेअरबाजारांनी तीन टक्क्यांपर्यंत लोळण घेतली. भारतीय शेअर बाजारही अर्थातच त्याला अपवाद ठरले नाही व त्यांनीही आज तीन टक्के घट नोंदवली. रशिया-युक्रेन युद्धाबरोबर कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या भावानेही आगीत तेल ओतले गेले.

प्रमुख भारतीय शेअरमध्ये आज सुमारे ३८ रुपयांनी वाढलेल्या टीसीएस चा अपवाद ठरला. त्याने बीएसई वर एक टक्का वाढीसह ३,७३४ रुपयांचा बंद भाव दिला. इतके दिवस तेजी दाखवीत असलेल्या बँका आणि वित्तसंस्थांच्या शेअरमध्ये आज सर्वात जास्त पडझड झाली.

गेल्या दोन सत्रांमधील पडझडीमुळे बीएसई वरील सर्व गुंतवणुकदारांच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य सुमारे १० लाखकोटी रुपयांनी घसरले आहे. गुरुवारी सेन्सेक्समधील सर्व शेअरचे एकूण भांडवली मूल्य २६७ लाखकोटी रुपये होते. तर आज दिवसअखेरीस ते २५८ लाखकोटी रुपयांपर्यंत आले.

रशिया युक्रेनवर केव्हाही आक्रमण करू शकेल अशी विधाने अमेरिकेच्या अध्यक्षांसह युरोपीय नेत्यांनीही केली. या भीतीने आज भारतासह अमेरिकी, युरोप व आशियाई शेअर बाजारात जोरदार विक्री झाली. ५३१.९५ अंशांनी (३.६ टक्के) घसरलेला निफ्टी १६,८४२.८० अंशांवर बंद झाला. तर १,७४७.०८ अंशांनी (३ टक्के) घसरलेला सेन्सेक्स ५६,४०५.८४ अंशावर स्थिरावला. सेन्सेक्सने आज दुपारी ५७,१९१.९१ अंशांपर्यंत मजल मारली होती, मात्र दीड वाजल्यानंतर युरोपीय शेअरबाजारही पावणेदोन ते तीन टक्क्यांपर्यंत कोसळल्याने सेन्सेक्स, निफ्टीनेही त्यांचेच अनुकरण केले.

आज बीएसई वर ५७० शेअरच्या भावांना लोअर सर्किट लागले तर २५८ शेअरना अप्पर सर्किट लागले. बीएसई वरील एकूण तीन हजार ६७० शेअरपैकी १५ टक्के म्हणजे ५६७ शेअरचे भाव वाढले तर तब्बल ८१ टक्के म्हणजे २,९८४ शेअरचे भाव घसरे. फक्त चार टक्के म्हणजे ११९ शेअरचे भाव आहे तेच राहिले. सेन्सेक्सच्या प्रमुख ५० तर निफ्टीच्या मुख्य ३० पैकी फक्त टीसीएस वगळता अन्य सर्व शेअर तोटा दाखवीत बंद झाले. आज युरोपीय बाजार पावणेदोन ते तीन टक्के कोसळले, अमेरिका तीन टक्के, जपान सव्वादोन टक्के, तैवान पावणेदोन टक्के, हाँगकाँग दीड टक्के तर शांघाय शेअरबाजार एक टक्का कोसळला.

आज टाटास्टील टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे ५.४९ टक्के म्हणजेच ६८ रुपयांनी कोसळून १,१८५ रुपयांवर स्थिरावला. १२९ रुपयांनी पडलेला एचडीएफसी २,२९७ रुपयांवर तर २७ रुपयांनी पडलेला स्टेटबँक ५०१ रुपयांवर आला. आयसीआयसीआय बँक (बंद भाव ७५३ रु.), ८१ रुपयांनी घसरलेला कोटक बँक (१,७४७), ३७८ रुपयांनी पडलेला मारुती (८,३६१) व ४१ रुपयांनी घसरलेला इंडसइंड बँक (९४०) हे शेअर सव्वाचार ते साडेपाच टक्के कोसळले.

त्याखालोखाल बजाज फिनसर्व्ह (१५,६८१), डॉ. रेड्डीज लॅब (४,२०७), एचडीएफसी बँक (१,४७३), बजाज फायनान्स (६,७८९), अल्ट्राटेक सिमेंट (७,०८६), महिंद्र आणि महिंद्र (८२४), आयटीसी (२१९), विप्रो (५४१), एअरटेल (६८८), अॅक्सीस बँक (७७३) व एलअँडटी (१,७९९) यांचे भावही अडीच ते पावणेतीन टक्के कोलमडले. एशियन पेंट, इन्फोसिस व टेक महिंद्र या शेअरचे भावही दोन टक्क्यांच्या आसपास घसरले. नेस्ले, हिंदुस्थान युनिलीव्हर, एचसीएलटेक, रिलायन्स, सनफार्मा, टायटन यांची घसरण अर्धा ते दोन टक्के अशी होती.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने - ५०,५१० रु.

चांदी - ६३,८०० रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT