Naveen Shekharappa father said on despite getting good marks he could not secure a medical seat  
देश

युक्रेनमध्ये मुलगा गमावलेले वडील म्हणाले, '९७ टक्के गुण असूनही इथे…'

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन-रशिया (Russia Ukraine war) यांच्यात सुरु असलेल्या युध्दात हजारो भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेय. यातच युक्रेनमधील खारकीव येथे झालेल्या गोळीबारात मूळचा कर्नाटक येथील एका 21 वर्षीय विद्यार्थ्यी नवीन शेखरप्पा याचा मृत्यू झाला. हा विद्यार्थी कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे राज्य सरकारने सांगितले. दरम्यान मुलाच्या मृत्यूनंतर नवीन शेखरप्पा यांच्या वडिलांनी (Naveen Shekharappa Father) पीयूसी मध्ये ९७ टक्के गुण मिळवूनही त्याला मेडिकलमध्ये प्रवेश मिळाला नाही अशी खंत व्यक्त केली.

त्यांनी सांगितलं की, पीयूसीमध्ये ९७ टक्के गुण मिळवूनही मुलाला कर्नाटकात मेडिकल कॉलेजमध्ये जागा मिळू शकली नाही. मेडिकल सीट मिळविण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागतात आणि मग कमी पैसे खर्च करून विद्यार्थी परदेशात तेच शिक्षण घेतात. नवीन शेखरप्पा यांचे पार्थिव परत आणणार असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले, आम्ही याबाबत स्थानिक प्राधिकरणाच्या संपर्कात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. नवीनच्या मृत्यूची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन शेखरप्पाच्या वडिलांचे (Naveen Shekharappa Father) सांत्वन केले होते.

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तुमच्या सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे ज्यांनी आपला मुलगा गमावला त्या कर्नाटकातील कुटुंबांना तुम्ही काय उत्तर द्याल? युक्रेन-रशिया युद्धात २० हजार भारतीय नागरिकांचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही प्रचार करण्यात व्यस्त आहेत. हजारो विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्याची जबाबदारी कोणाची? असे अनेक सवाल सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT