Russia Ukraine war rejected by Indian army 21 year old engineering student joins Ukrainian forces  
देश

भारतीय लष्करात नाकारलं; तमिळनाडूतील २१ वर्षाचा इंजिनीअर लढतोय युक्रेनकडून

सकाळ डिजिटल टीम

सध्या रशिया-युक्रेन (Russia Ukraine) यांच्यात युध्द सुरु आहे. या युध्दाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. या दरम्यान तामिळनाडूमधील 21 वर्षीय एरोस्पेस इंजिनीअरिंग विद्यार्थ्याला त्याच्या उंचीमुळे दोनदा भारतीय सैन्याने नाकारलं, तो आता जॉर्जियन नॅशनल लीजन या अर्धसैनिक दलाचा एक भाग म्हणून युक्रेनसाठी रशियाविरुद्ध लढत आहे. अशी माहिती केंद्र आणि राज्य सरकारच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी कोईम्बतूरमधील थुडियालूरजवळील सुब्रमण्यमपलायम येथील साईनिखेश रविचंद्रन (Sainikhesh Ravichandran) याच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी, त्यांनी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, वागणूक आणि युक्रेनसाठी शस्त्र उचलण्याच्या त्याच्या निर्णयाचे संभाव्य कारण काय असेल याची चौकशी करणारा रिपोर्ट सादर केला. साईनिखेशच्या कुटुंबीयांनी त्याला घरी परतण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने नकार दिला.

त्याच्याबद्दल माहिती गोळा करणाऱ्या टीमचा भाग असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना त्याच्या खोलीत भिंतीवर प्लॅस्टर केलेले सैनिकांचे पोट्रेट आढळले. त्याने साईनिखेशने 2018 मध्ये विद्या विकासिनी मॅट्रिक्युलेशन संस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केले .

बारावीनंतर साईनिखेशने सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्याच्या एका मित्राने TOI ला सांगितले की त्याने त्याला अमेरिकन सैन्यात सामील होण्याची संधी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एकदा चेन्नईतील यूएस वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला होता. तो करू शकत नाही हे लक्षात येताच, साईनिखेश सप्टेंबर 2018 मध्ये खारकीव्ह येथील नॅशनल एरोस्पेस युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

तो विद्यापीठाच्या वसतिगृहात राहिला. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, साईनिखेश इतकी वर्षे सामान्य होता आणि त्याचा अभ्यास करत होता. त्यांचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम जुलैमध्ये संपत आहे. साईनिखेश हा शेवटी जुलै 2021 मध्ये भारतात आला होता आणि जवळपास दीड महिना राहिला होता. तो नियमित फोन कॉल्सद्वारे आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहीला, असे एका कौटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले. महिनाभरापूर्वी साईनिखेशने त्याच्या कुटुंबीयांना फोन करून व्हिडिओ गेम डेव्हलपमेंट कंपनीत पार्ट टाईम नोकरी मिळाल्याचे देखील सांगितले होते.

"जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा तो चार दिवस संपर्कात नव्हता. तेव्हाच आम्ही तामिळनाडूतील तरुण युक्रेनच्या सैन्यात सामील झाल्याचा मीडिया रिपोर्ट पाहिला आणि आम्हाला धक्का बसला," असे त्याच्या कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले.

कुटुंबीयांनी युक्रेनमधील भारतीय दूतावासाला ईमेल पाठवून साईनिखेशची चौकशी केली. पण सुरुवातीला काहीच उत्तर आले नाही. काही दिवसांनंतर दूतावासाने कुटुंबाशी संपर्क साधून साईनिखेशची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना खूप दिलासा मिळाला, साईनिखेशने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना खात्री दिली की, तो सुरक्षित आहे. निमलष्करी दलात कायम राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला समजवण्याचे अनेक प्रयत्न केले.

"आम्ही आता भयंकर परिस्थितीत आहोत. कृपया माझ्या मुलाबद्दल विचारू नका," असे त्याचे वडील रविचंद्रन (वय 52) म्हणाले. त्याची आई झांसी लक्ष्मी (वय 48), गृहिणी आहेl आणि त्याचा धाकटा भाऊ सायरोहित (वय 17), बारावीचा विद्यार्थी आहे. आपल्या मुलाला परत आणण्यासाठी कुटुंबाने राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची तयारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT