Russian ambesider_Denis Alipov 
देश

Video : "दोस्ती से ज्यादा कुछ नहीं होता"; रशियन राजदूतांकडून भारताच्या मैत्रीचं खुल्या दिलानं कौतुक

भारत-रशिया राजकीय संबंधांच्या ७५ वा वर्धापन दिन महोत्सवाला दिल्लीत सुरुवात झाली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारत आणि रशियामधील राजकीय संबंधांची ७५ वर्षे साजरी होत आहेत. यानिमित्त नवी दिल्ली येथे रशियन संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांच्या हस्ते झालं.

यावेळी त्यांनी भारताच्या मैत्रीचं खुल्या दिलानं कौतुक केलं. दोस्ती से ज्यादा कुछ भी नही होता, असं हिंदीतून त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा सुरु आहे. (Russian Ambassador appreciated India friendship)

अलीपोव्ह म्हणाले, आपण आज रात्री ते दोन्ही देशांमधील परस्पर सांस्कृतिक उत्सवांची परंपरा पुन्हा सुरू करत आहेत. कोविड महामारीमुळं अनेक वर्षांच्या ऑफलाइन सांस्कृतिक देवाण घेवाणीनंतर आता रशिया आणि भारताच्या राजकीय संबंधांच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महोत्सवात विविध कार्यक्रम सादर होतील.

हा कार्यक्रम म्हणजे दोन्ही राष्ट्रांमधील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक बंध, ऐतिहासिक मैत्री, परस्पर हितसंबंध, समज आणि विश्वास यांचे एक अतिशय ज्वलंत उदाहरण असेल," असे रशियन राजदूत म्हणाले. यावेळी भारताच्या मैत्रीचं कौतुक करताना त्यांनी हिंदीतील एक लोकप्रिय म्हणं अधोरेखीत केली.

"दोस्ती से ज्यादा कुछ भी नही होता" असं म्हणत दोन्ही देशांमधील लोकांमध्ये मैत्रीचे संबंध वाढवणे हेच या उत्सवाचे ध्येय असल्याचंही ते म्हणाले.

दिल्लीनंतर हा भारत-रशिया महोत्सव कोलकाता आणि मुंबईला जाईल त्यानंतर या महिन्याच्या 29 तारखेला पुन्हा दिल्लीला परत येईल. हा महोत्सवातील रशियाच्या खाद्यपदार्थांची चव आणि संस्कृतीचा आनंद लोक घेतील, याचा चांगला प्रभावर भारतीय जनतेवर पडेल असंही यावेळी अलीपोव्ह म्हणाले.

हेही वाचा- गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

भारतातील या महोत्सवाची सुरुवात रशियाची लोककला असलेल्या एन्सेम्बल लेझगिन्काच्या परफॉर्मन्सनं झाली. 'लेझगिंका' या नृत्याच्या महोत्सवाला 6 सप्टेंबर 1958 रोजी सुरुवात झाली. ही कला सादर करणाऱ्या कलाकारांनी जगभरातील 75 देशांचा दौरा केला आहे.

विशेषत: ही लोककथा नृत्य स्पर्धांच्या 52 जगप्रसिद्ध महोत्सवांचे विजेते ठरले आहेत. ऑगस्ट 2012 मध्ये, लेझगिन्का यांनी लंडनमधील ऑलिंपिक समर गेम्समध्ये देखील कला सादर केली होती. दागेस्तान, काकेशस आणि रशियाच्या लोकांची 100 हून अधिक नृत्ये यावेळी सादर करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान नसतं तर निवडणूक आयोगच नसतं' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT