देश

ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे; कोरोना, दहशतवाद मुद्दे अजेंड्यावर

विनायक होगाडे

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली नवी वैश्विक आव्हाने, बहुत ध्रुवीय व्यवस्थेची असलेली आवश्यकता, दहशतवाद यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची उद्या (ता. १) बैठक होणार आहे. तर, सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आणि चिनी परराष्ट्रमंत्री या बैठकीच्या निमित्ताने समोरासमोर येणार आहेत.

या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असल्याने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लेवरोव, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी, ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री कार्लोस अल्बर्टो फ्रांको फ्रांका, दक्षिण आफ्रिकेचे ग्रेस नेलेडी मेंडीसा पेंडोर सहभागी होतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्स देशांमधील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक मुद्यांवरही, दहशतवाद रोखण्यावर चर्चा अपेक्षित आहे. प्रमुख्याने कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यावरही ब्रिक्स देशांचे परराष्ट्रमंत्री चर्चा करतील.

कोरोनाविषाणूच्या उगम स्थानावरून चीनची कथित संशयास्पद भूमिका, अमेरिकी गुप्तहेर यंत्रणांनी चीनची सुरू केलेली चौकशी, तसेच कोरोना विषाणूंच्या उत्पत्तीचा आरोग्य संघटनेमार्फत शोध घेण्यास भारताने दिलेला पाठिंबा आणि परराष्ट्रमंत्री जय शंकर यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर लगेच होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिका दौऱ्यामध्ये जयशंकर यांनी अमेरिका भारत जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समूह असलेल्या ‘क्वाड’ची जोरदार पाठराखण केली होती. दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या विस्तारवादी भूमिकेला पायबंद घालण्यासाठी स्थापन झालेल्या ‘क्वाड’ला चीन सोबतच रशियाचा देखील विरोध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT