उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला. कानपूर आणि भीमसेन स्थानकांदरम्यान Sabarmati Express चे अनेक डबे रुळावरून घसरले. दरम्यान या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
प्राथमिक माहितीनुसार, दगड इंजिनवर आदळल्याचे चालक सांगत आहेत. इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कानपूरजवळील गोविंद पुरीसमोर होल्डिंग लाइनवर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमधील सर्व प्रवाशांना अपघातस्थळावरून बसने कानपूरला आणण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेन क्रमांक 19168 साबरमती एक्स्प्रेस वाराणसीहून अहमदाबादला जात असताना कानपूर आणि भीमसेन स्थानकादरम्यान रुळावरून घसरली.
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.
दरम्यान अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण ट्रेनचे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पायलट दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत.
6 दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये पंजाब मेल एक्सप्रेसमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. रविवारी ट्रेन क्रमांक १३००६ हावडाहून अमृतसरला जात होती. सकाळी आठच्या सुमारास ट्रेन बरेली आणि कटरा स्थानकादरम्यान पोहोचली तेव्हा प्रवाशांमध्ये आरडाओरडा झाला. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली.
पण प्रवाशांना ट्रेनमधून उड्या मारताना पाहून पायलटला धक्काच बसला. त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवून प्रवाशांना सावरले.
आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्रवाशांनी सांगितले. ट्रेन कटरा स्थानकावर सुमारे 45 मिनिटे उभी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.