sakal media group wan infra international award sakal
देश

Sakal Media Group : ‘सकाळ’ला रंगीत छपाईचा आंतरराष्ट्रीय सन्मान

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ आज ‘इंडियन प्रिंटर समीट’मध्ये प्रदान करण्यात आला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

हैद्राबाद - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ आज ‘इंडियन प्रिंटर समीट’मध्ये प्रदान करण्यात आला. ‘सकाळ’ समूहाच्या पुणे व कोल्हापूर आवृत्यांचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला आहे. येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी हा सन्मान स्वीकारला.

‘वॅन इफ्रा’ दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मगदूम मोहंमद, ‘दि. प्रिंटर म्हैसूर लि.’ संचालक के.एन.सनथकुमार यांच्या हस्ते ‘सकाळ’चा गौरव करण्यात आला.

या पुरस्कारामुळे जगभरातील उत्कृष्ट छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांच्या समूहात ‘सकाळ’चा समावेश झाला आहे. जगभरातून ३९ वृत्तपत्रांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. भारतातून नऊ माध्यम समूहांचा सहभाग होता. प्रादेशिक भाषेत ‘सकाळ’ ने हा मानाचा पुरस्कार मिळविला. सकाळ समूहाचे संजय वागळे, बाळासाहेब मुजुमले, जयेश गायकवाड, श्रीकांत गोडबोले, सुमीत धर्माधिकारी आणि विजय चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

जागतिक पातळीवर गुणवत्तेचे निर्धारण करण्यासाठी वृत्तपत्रांना सल्ला व सेवा देण्यासाठी ‘वॅन इफ्रा’ संस्थेची १९६१ मध्ये स्थापना झाली. छपाईच्या गुणवत्तेचे मानांकन करण्यासाठी १९९४ पासून इफ्राच्यावतीने आंतरराष्ट्रीय ‘कलर क्वालिटी क्‍लब’ च्या माध्यमातून दर दोन वर्षांनी ही स्पर्धा घेण्यात येते.

वर्ल्ड प्रिंटर्स (डब्लूपीएफ) फोरमकडून २६ वी ‘इंटरनॅशनल कलर क्वालिटी क्‍लब’ स्पर्धा एप्रिल ते मे २०२४ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘सकाळ’ने रंगीत छपाईतील गुणवत्तेसाठी हा पुरस्कार पटकावला असून यापूर्वी ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीला चार आणि कोल्हापूर आवृत्तीला दोन वेळा या पुस्काराने गौरविण्यात आले आहे.

वॅन इफ्रा- स्टार क्लब सदस्यत्व

‘इंटरनॅशनल कलर क्वालिटी क्‍लब’ या स्पर्धेचे दोन वर्षांतून एकदा आयोजन करण्यात येते. पाच वेळा इंटरनॅशनल कलर क्वालिटी क्‍लब चे सदस्यत्व मिळविल्यास त्या वृत्तपत्राचा मानांकित ‘स्टार क्लब’मध्ये समावेश करण्यात येतो.

२०२४-२६ या वर्षीच्या पुरस्काराने ‘सकाळ’ समूहाच्या ‘पुणे’ आवृत्तीचा ‘स्टार क्लब’ मध्ये समावेश झाला आहे. छपाईचा दर्जा कायम राहावा, यासाठी ही स्पर्धा उपयोगी ठरते. या स्पर्धेत मिळालेले यश हे सहभागी प्रकाशन संस्था, वाचक आणि जाहिरातदारांना चांगल्या प्रतीचे वृत्तपत्र देण्यासाठी संबंधित संस्था कटिबद्ध आसल्याचे निदर्शक मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT