नवी दिल्ली : ‘‘नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या बाजूला लावण्यात आलेला सेंगोल काढून लोकशाही वाचवा,’’ अशी मागणी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे (सप) खासदार आर. के. चौधरी यांनी केली. यामुळे पुन्हा एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलची स्थापना लोकसभेत केली होती. तमीळ संस्कृतीतील राजदंड म्हणजेच सेंगोल. देशाला स्वतंत्र्य मिळाल्याचे प्रतीक म्हणून हा सेंगोल देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अर्थात १४ आॅगस्ट १९४७ रोजी हा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर हा राजदंड अलाहाबाद येथील एका संग्रहालयामध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर नवीन संसदेची इमारत उभारल्यानंतर या इमारतीमध्ये हा सेंगोल लावण्यात आला.
दरम्यान, ‘‘सेंगोल हा राजाच्या व्यवस्थेचे प्रतीक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत सेंगोल सारख्या राजेशाहीच्या प्रतीकांना कोणतेही स्थान नसल्याने हा सेंगोल काढून टाकावा,’’ अशी मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदार चौधरी यांनी केली आहे. या मागणीला राष्ट्रीय जनता दलाच्या खासदार मिसा भारती आणि काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनीही समर्थन दिले आहे. सप खासदार आर. के. चौधरी यांच्या या मागणीमुळे आता यावरून लोकसभेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.