लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा (Uttar Pradesh Assembly Election 2022) निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने पूर्ण तयारी केली असून, अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यूपीमध्ये सपा सरकार परत आल्याचा दावा करत आहेत. दरम्यान, पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित झाले आहे. तर, माजी मंत्री आणि सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान (Azam Khan) यांना रामपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. (Samajwadi Party Releases List Of 159 candidates for UP Election)
आझम खान (Azam Khan) सध्या तुरुंगात असून त्यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. याशिवाय अमापूरमधून सत्यभान शाक्य, पिलीभीतमधून शैलेंद्र गंगवार आणि लखीमपूर खेरीच्या निघासन मतदारसंघातून आरएस कुशवाह यांना तिकीट देण्यात आले आहे.गोला गोकरनाथ येथून विनय तिवारी, तर लखीमपूर खेरी येथून उत्कर्ष वर्मा आणि हरदोई येथून अनिल वर्मा यांना तिकीट मिळाले आहे. मनोज पांडे यांना उंचाहर मतदारसंघातून, सुमन मौर्य यांना फारुखाबादमधून, अमिताभ बाजपेयी यांना कानपूरच्या आर्यनगर मतदारसंघातून, दादू प्रसाद यांना बुंदेलखंडच्या नरैनी मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. (UP Election Latest News In Marathi)
अखिलेश पहिल्यांदाच लढवत आहेत विधानसभा निवडणूक
सपा प्रमुख अखिलेश पहिल्यांदाच (Akhilesh Yadav) विधानसभा निवडणूक लढवत आहेत. 2000 मध्ये अखिलेश यादव कन्नौजमधून निवडणूक जिंकून पहिल्यांदा लोकसभेत (Loksabha) पोहोचले. 2004 आणि 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही ते कन्नौजमधून विजयी झाले आणि लोकसभेत पोहोचले. यानंतर 2012 मध्ये अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (UP CM) झाल्यावर त्यांना कन्नौज लोकसभा मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर अखिलेश यादव विधान परिषदेचे सदस्य झाले. विधानसभेच्या निवडणुकीत अखिलेश पहिल्यांदाच उतरले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.