मुंबई : गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच गोवा भाजपमध्ये (Goa BJP) धुसफूस पाहायला मिळत आहे. भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर (Late Manohar Parrikar) यांचा मुलगा उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) आणि भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये तू-तू-मैं-मैं रंगलेली पाहायला मिळाली. त्यावरूनच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजप वगळून सर्व पक्षांना एक विनंती केली आहे.
हीच खरी पर्रीकरांना श्रद्धांजली -
गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पन पर्रीकर जर स्वतंत्र्य लढत असतील तर त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. तसेच त्यांच्याविरोधात कोणीही उमेदवार देऊ नये. त्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टी, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या तिन्ही पक्षांसमोर संजय राऊतांनी प्रस्ताव ठेवला आहे. हीच खरी पर्रीकरांना श्रद्धांजली असेल, असं संजय राऊत म्हणाले.
उत्पल पर्रिकर हे पणजी येथून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. पण, देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल फक्त पर्रीकरांचा मुलगा आहे म्हणून त्यांना तिकीट देण्यास योग्य समजलं जाणार नाही असं म्हटलं. त्यानंतर उत्पल पर्रीकर आणि फडणवीसांमध्ये शाब्दीक वार रंगल्याचे पाहायला मिळाले.
उत्पल यांनी फडणवीसांना उत्तर देखील दिलं. गोव्यात सुरू असलेलं राजकारण मी सहन करू शकत नाही. फडणवीसांना नेमकं काय म्हणायचे आहे? जो जिंकू शकेल तोच चांगला उमेदवार आहे का? व्यक्तीच्या चारित्र्याचं काहीही महत्व नाही का? असे सवाल त्यांनी फडणवीसांना केले. तसचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट दिल्यानंतर आम्ही गप्प बसायचं का? भाजपने पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार अतानासियो मोनसेरेट यांना तिकीट दिलं तर मी गप्प बसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी फडणवीसांना दिला. आता संजय राऊतांनी उत्पल पर्रीकरांची बाजू लावून धरली आहे. त्यामुळे उत्पल यांना भाजपनं जर तिकीट नाकारलं तर ते इतर पक्षांचा मार्ग देखील धरू शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.