Sardar Vallabhbhai Patel  ESAKAL
देश

Sardar Vallabhbhai Patel: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जिवनप्रवास...

1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्याकरता वल्लभभाई इंग्लंडला गेले.

सकाळ डिजिटल टीम

Sardar Vallabhbhai Patel: सरदार वल्लभभाई पटेल  हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलन आणि स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळातील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. पटेल यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी जास्त योगदान दिलं की स्वातंत्र्यानंतर हे ठरवणे अवघड आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भारताच्या एकीकरणातील त्यांची अतुलनीय भूमिका अधिक लक्षात राहते. पण एकेकाळी राजकारणापासून दूर राहणाऱ्या पटेल यांच्या आयुष्यात अनेक बदल घडून आले, ज्यामुळे ते देशाचे सरदार आणि लोहपुरुषाच्या उंचीपर्यंत पोहोचले.

वल्लभाईंचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 ला एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चैथे अपत्य. वल्लभाईंचे वडिल शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई, विठ्ठलभाई व सोमाभाई आणि एक बहिण जीचे नाव दहीबा पटेल असे होते.त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1891 साली झावेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्या पासुन दहयाबाई आणि मणिबेन पटेल अशी दोन अपत्ये झालीत.वल्लभभाईंची पत्नी झावेरबा कॅंसर ने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दिर्घकाळ टिकला नाही 1909 साली त्यांचे निधन झाले.

ज्यावेळी झावेरबांच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पुर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्युची बातमी त्यांनी सर्वांना दिली. पुढे आपले संपुर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणुन व्यतीत केले.आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कुल मधुन पुर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण पुर्ण करण्याकरीता त्यांना विलंब लागला. 1897 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केली.घरची परिस्थीती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहुनच पुस्तकं उधार घेउन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणाऱ्या परिक्षेचा अभ्यास सुध्दा त्यांनी घरूनच केला.अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परिक्षेत त्यांना सगळयात जास्त गुण मिळाले.

पुढे 1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्याकरता वल्लभभाई इंग्लंडला गेले. त्यांना काॅलेजचा कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुध्दीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमधे पुर्ण केला.  अश्याप्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवीली, या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि काॅलेज मधुन पहिले आले.

त्यानंतर मग वल्लभभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. वकिलीतील त्यांची समज पाहुन ब्रिटीश सरकारने त्यांना कित्येक मोठया पदांवर नियुक्ती देण्यास आमंत्रीत केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटीश शासनाचा एकही प्रस्ताव स्विकारला नाही कारण त्यांना ब्रिटींशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्यांचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटींशाकडुन आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.

पुढे ते अहमदाबाद येथे एक यशस्वी बॅरिस्टर म्हणुन काम करू लागले, सोबतच ते गुजरात क्लब चे सदस्य देखील झाले या दरम्यान त्यांनी महात्मा गांधीजींच्या एका व्याखानात भाग घेतला त्यावेळी ते गांधीजींच्या विचारांनी फार प्रभावित झाले. पुढे गांधीजींचा कट्टर अनुयायी बनण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अश्यातऱ्हेने ते गांधीवादी सिध्दांतावर चालु लागले हळुहळु राजकारणाचा हिस्सा बनले.

भारताच्या स्वातंत्र्याचे महानायक महात्मा गांधी यांच्या प्रभावशाली विचारांनी प्रेरित होउन वल्लभभाईंनी अस्पृश्यता, जातीयवाद, स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचारा विरोधात आवाज उठविला आणि समाजात पसरलेली नकारात्मकता दुर करण्याकरीता भरपुर प्रयत्न केलेत.सोबतच गांधीजींच्या विचारधारेला स्विकारत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतलामहात्मा गांधीजींच्या शक्तिशाली विचारांनी प्रभावित झालेल्या वल्लभभाई पटेलांनी 1917 साली शेतकऱ्यांच्या आंदोलनात महत्वाची भुमिका बजावली. त्या दरम्यान गुजरात मधील ग्रामीण भाग मोठया प्रमाणात दुष्काळाचा सामना करीत होता अश्यात शेतकरी ब्रिटीशांनी लावलेले अवास्तव कर देण्यास समर्थ नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांनी ब्रिटीश शासनाला करात सवलत देण्याची विनंती केली होती.

परंतु शेतकऱ्यांच्या या प्रस्तावाला ब्रिटीश शासनाने धुडकावुन लावले त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल यांनी मोठया प्रमाणावर ’नो टॅक्स कॅंपेन ’ या मोहिमेचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न भरण्यास प्रोत्साहन दिले.या संघर्षामुळे ब्रिटीश शासनाला सरदार पटेलांच्या दृढ संकल्पापुढे झुकण्यास मजबुर व्हावे लागले आणि शेतकऱ्यांना करा मधे सवलत द्यावी लागली. स्वातंत्र्य समरात सरदार वल्लभ भाई पटेलांचे हे पहिले मोठे यश मानल्या गेले.वल्लभ भाई पटेल गांधीजींच्या विचारांनी एवढे प्रभावित होते की 1920 साली असहकार आंदोलनादरम्यान त्यांनी स्वदेशी खादी वस्तुंचा स्विकार केला आणि विदेशी कपडयांची होळी केली. याशिवाय वल्लभभाई पटेलांनी गांधीजींनी शांततापुर्वक केलेल्या देशव्यापी आंदोलन उदा. स्वातंत्र्य संग्राम, भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा यात गांधीजींचे समर्थन करीत सहकार्य केले.

आपल्या बोलण्याच्या शैलीने जनसामान्यांना प्रभावित करणाऱ्या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटीश व्हाईसराय ला पराभव पत्करावा लागला.

या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिध्द झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणु लागले त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावा आधी जोडल्या गेलेदिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमधे त्यांनी सतत विजय मिळवला. 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालीकेचे अध्यक्ष म्हणुन निवडल्या गेले.

1931 साली वल्लभभाई पटेल कॉंग्रेस च्या 36 व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशाच्या कॉंग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणुन नियुक्त झाले पुढे 1945 पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले. या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावे लागले.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहाता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिध्दी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामथ्र्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीं मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासुन दुर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले.

स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळया साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दुरदर्शीपणाचा आणि बुध्दीमत्तेचा वापर करत संघटीत केले आणि वेगवेगळया राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली. त्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. 

वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले. वल्लभभाई पटेलांनी अश्या तऱ्हेने भारतीय संघाला कोणत्याही युध्दाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रीत केले. या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरूष ही पदवी देण्यात आली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT