सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत- चीनमधील संबंध सध्या दुरावलेले आहेत. यामध्ये भारत कमी पडला का? या प्रश्नावर बोलताना श्री. पवार यांनी आपली मते व्यक्त केली.
श्री. पवार म्हणाले, ""मुळात भारत- चीन दरम्यानचा प्रश्न संवेदनशील आहे. गलवान खोऱ्यातून जाणारा रस्ता भारताने बनविलेला आहे. या रस्त्याचा वापर आपण सियाचिनमधील आपल्या भूभागात जाण्यासाठी करतो. या रस्त्याच्या एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला आपण आहोत. हा रस्ता भारताचा असूनही चिनी सैन्य काही वेळेसाठी या रस्त्यावर येते. त्या वेळी दोन्हीकडील सैन्यात धरपकड होते. त्यातून धक्काबुकीचे प्रकार होतात.
1993 मध्ये मी संरक्षणमंत्री असताना चीनला गेलो होतो. त्या वेळी तेथील संरक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून सीमेवरील सैन्य कमी करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना चीनला गेले. त्या वेळी चीनबरोबर त्याबाबत करार झाला. त्यानंतर दोन्ही बाजूचे सैन्य कमी केले. गलवान भागात दोन्ही देशांनी कधीही बंदुकीचा वापर केलेला नाही. ज्यावेळी सीमेवर संघर्ष होतो, त्या वेळी फायरिंग होते; पण येथे फायरिंग होत नाही, केवळ धक्कबुकी होते. कारण तेथे तसा करार झालेला आहे. मध्यंतरी जे काही झाले ते आपल्या रस्त्यावर चीनच्या सैन्यांनी अतिक्रमण केल्यामुळे झाले, तसेच गस्त घालत असताना कोणीही येऊ शकते. त्यामुळे या प्रकरणी संरक्षण मंत्रालयावर आरोप करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी म्हणतात, की चीनने आपला भूभाग बळकावला आहे, यावर श्री. पवार म्हणाले, ""काही भाग चीनने बळकावलांय हे खरे आहे. चीनच्या युद्धानंतर 47 हजार किलोमीटरची आपली भूमी चीनने ताब्यात घेतली आहे. ती आज घेतलेली नाही; पण आपण आरोप करतो त्या वेळी पूर्वीच्या काळी काय घडले हे माहीत असायला हवे. या गोष्टीचे राजकारण होऊ नये, कारण हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून, तो राजकारणापलीकडचा आहे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.