नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyender Jain) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering) अंमलबजावणी संचालनालयाने काल अटक केली. त्यानंतर आज जैन यांना 9 जूनपर्यंत ईडी कस्टडीत (ED Custody) पाठवण्यात आले आहे. दरम्यान, जैन यांच्यावरील कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वो अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. (Satyendar Jain Sent ED Custody)
आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचे (Money Laundering Case) हे ईडी प्रकरण ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांच्या आणि इतरांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी एप्रिलमध्ये सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात जप्त केली होती. जैन हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि जलमंत्री आहेत. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणासंदर्भात शकूर बस्ती येथील आपच्या आमदाराची चौकशी केली होती.
सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर केजरीवालांची प्रतिक्रियी, म्हणाले...
अरविंद केजरीवाल यांचे मंत्रीमंडळात आरोग्य मंत्री असणाऱ्या सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे, यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देत ईडीची ही कारवाई पूर्णपणे खोटी आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध एजन्सीने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांचे केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मंगळवारी खंडन करत जैन यांच्याविरोधात कोणताही क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला नसल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.