Savitri Thakur  esakal
देश

Savitri Thakur : सावित्री ठाकूर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, १० वी पास असणाऱ्या आदिवासी महिला मंत्री!

राजकारणात प्रवेश करणाऱ्या ठाकूर या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य आहेत

सकाळ डिजिटल टीम

Savitri Thakur :

खासदारकीच्या पदावर अनेकजण निवडून आले आणि त्यांनी काल शपथही घेतली. खासदारांमध्ये कोणी डॉक्टर, कोणी वकिल तर कोणी सीए आहेत. पण १० वी पास झालेल्या कुणाला खासदारकी मिळेल असे वाटते का?  हो हे खरंच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सावित्री ठाकूर या आदिवासी समाजातून आहेत. इतकेच नाही, तर उच्चशिक्षित खासदारांच्या बरोबरीने १० वी शिक्षण झालेल्या सावित्री आहेत.  

सावित्री ठाकूर या याआधी दोन वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या आहेत. त्या 46 वर्षी देशाच्या मंत्री झाल्या आहेत. सावित्री ठाकूर यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून लोकसभेत पोहोचलेल्या सावित्री यांनी धर्मपुरी तालुक्यातील तारापूर गावातून दिल्लीपर्यंतचा अविश्वसनीय प्रवास केला.

'दीदी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकूर यांनी काँग्रेसचे उमेदवार राधेश्याम मोव्हेल यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. 1996 मध्ये त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. एका स्वयंसेवी संस्थेत सामील होऊन त्या धारमधील आदिवासी आणि गरीब महिलांचे जीवन बदलण्याचे काम करत राहिल्या.

महिलांना छोटी कर्जे उपलब्ध करून देणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि दारूबंदीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. दहावी पास सावित्री ठाकूर यांनी दशकभर समाजसेविका म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

राजकारणात प्रवेश करणाऱ्या ठाकूर या त्यांच्या कुटुंबातील पहिल्या सदस्य आहेत. त्यांचे वडील वनविभागातून निवृत्त झाले असून पती शेतकरी आहेत. 2003 मध्ये सावित्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि जिल्हा पंचायत सदस्या बनल्या. वर्षभरानंतरच पक्षाने त्यांना जिल्हा पंचायत अध्यक्षपदाची जबाबदारी दिली.

2014 मध्ये ठाकूर यांना धार मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा त्या एक लाख मतांनी विजयी झाल्या. 2019 मध्ये त्यांना तिकीट दिले गेले नाही. यावेळी पुन्हा पक्षाने सावित्रींवर विश्वास दाखवला आणि त्या विजयी झाल्या.

सावित्री यांनी संस्थेतही अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 2017 मध्ये, सावित्री यांना किसान मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले. सध्या त्या आदिवासी महिला विकास परिषदेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

'सावित्री देशाच्या महिला शेतकरी नेत्यांपैकी एक आहे. त्या अत्यंत नम्र नेत्या असून शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांवर त्या नेहमीच आवाज उठवतात. दोन दशकांहून अधिक काळ त्या खते आणि बियाणांचा प्रश्न मांडत आहेत, असे धारचे राजकीय तज्ज्ञ योगेंद्र शर्मा म्हणतात.

शर्मा पुढे म्हणतात, 'मोदी मंत्रिमंडळात ठाकूर यांचा समावेश केल्याने काँग्रेसच्या आदिवासी बालेकिल्ल्यात भाजपला मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT