Yogi Adityanath : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेट स्पीच प्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2007 मध्ये सीएम योगी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनव्ही रमण, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने आज या प्रकरणी निकाल दिला.
प्रक्षोभक भाषणाच्या आरोपाखाली मुख्यमंत्री योगी यांच्यावर खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी नाकारली. यापूर्वी मे 2017 मध्ये राज्य सरकारने हा खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. तेव्हा सरकारने सांगितले की, खटल्यातील पुरावे अपुरे आहेत. जे 2018 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानेही कायम ठेवले होते.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, या याचिकेत योग्यता नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास परवानगी देता येणार नाही. खरे तर हे प्रकरण गोरखपूर दंगलीचे आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सीएम योगींच्या कथित भाषणाची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.
२००७ मध्ये गोरखपूरमध्ये उसळलेली दंगल
याचिकाकर्ते परवेज परवाज यांनी सांगितले की, तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांच्या भाषणानंतर २००७ मध्ये गोरखपूरमध्ये दंगल झाली होती. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. राज्य सीआयडीने 2008 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरची अनेक वर्षे चौकशी केली. 2015 मध्ये त्यांनी राज्य सरकारकडे खटला चालवण्याची परवानगी मागितली. याचिकेत म्हटले आहे की, मे 2017 मध्ये राज्य सरकारने परवानगी नाकारली. राज्य सरकारने खटला चालवण्याची परवानगी नाकारली तोपर्यंत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले होते. अशा स्थितीत अधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय दबावाखाली घेतला असावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.