Second COVID-19 Vaccine Cleared For Phase I, II Human Trials In India 
देश

चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना अशा परिस्थितीत कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर असून भारतात कोरोनावर दुसरी लस विकसित करण्याला यश आले आहे. आठवडाभरात भारतासाठी ही मोठी बातमी आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काही दिवसांपूर्वी देशात भारत बायोटेक या कंपनीने कोरोनावरील पहिली लस विकसित केली होती. त्यांनंतर आता कोरोनावरी दुसरी लस विकसित झाली आहे. कोरोनाची ही दुसरी लस अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने तयार केली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या लसीच्या फेज १ आणि फेज २ च्या मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे. दरम्यान, ही मानवी चाचणी पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. या लसीची प्राण्यांवर यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. याच आधारावर त्यांना पुढील फेजसाठी चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कंपनी लवकरच मानवी चाचणीसाठी एनरॉलमेंट प्रक्रिया सुरू करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कंपनीला तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचंही म्हटलं जात आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारनंदेखील उशीर न करता त्वरित याच्या पुढील चाचणीला परवानगी दिली आहे.

दरम्यान, भारत बायोटेकने बनवलेल्या लसीची या महिन्यात चाचणी करण्यात येणार आहे. भारत बायोटेकनं करोनावरील COVAXIN लस तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली कोरोना लस तयार केल्याचे भारत बायोटेकच्या व्यवस्थापकीय संचलकांनी सांगितले होते. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

WBBL, Video: कडक! स्मृती मानधानाने पळत येत घेतला अफलातून कॅच, Video होतोय व्हायरल

Pune Assembly Election 2024 : खा मटण, दाबा आमचे बटण; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT