Security of 424 VIPs restored Security of 424 VIPs restored
देश

४२४ व्हीआयपींची सुरक्षा बहाल; पंजाबच्या आप सरकारने बदलला निर्णय

सकाळ डिजिटल टीम

चंदीगड : गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आणि पंजाबमध्ये न्यायालयाने फटकारल्यानंतर आम आदमी पक्षाच्या सरकारने ४२४ व्हीआयपींची सुरक्षा (VIP Security) बहाल केली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सहभाग होता. पंजाब (Punjab government) आणि हरयाणा हायकोर्टाने यादी लीक झाल्याबद्दल पंजाब सरकारला फटकारले होते. (Security of 424 VIPs restored)

व्हीआयपींची (VIP) सुरक्षा मर्यादित कालावधीसाठीच काढण्यात आली आहे, असे पंजाब सरकारने (Punjab government) सांगितले होते. त्याचवेळी सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्यांच्या वडिलांनीही मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून सुरक्षा हटवण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणाची वर्तमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असेही ते म्हणाले होते. सिद्धूच्या वडिलांनी भगवंत मान सरकार यांच्याकडे न्यायाची मागणी केली होती.

कोणाची सुरक्षा (Security) हटवायची असेल तर त्याचा योग्य तो आढावा घ्यावा, तरच तसा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने पंजाब सरकारला सांगितले होते. पंजाब सरकारने (Punjab government) ४२४ व्हीआयपींची सुरक्षा हटवली होती. यामध्ये शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते चरण जीत सिंह ढिल्लो, सतगुरू उदय सिंह, संत तरमिंदर सिंग यांचाही समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT