Anju in Pakistan: पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन मीणा यांची आंतरराष्ट्रीय लव स्टोरी ताजी असतानाचं राजस्थानची अंजू चर्चेत आली आहे. ती आपल्या पाकिस्तानी मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली. हे प्रकरण बहुचर्चित सीमा हैदर प्रकरणाशी जोडलं जातंय.मात्र, अंजूने या गोष्टीला नकार दिला आहे. अशातचं तिच्या पाकिस्तानी मित्राने मोठा खुलासा केलाय.
राजस्थानमधून पाकिस्तानला गेलेल्या अंजूच्या प्रकरणात एक मोठी खुलासा समोर आलाय. हा खुलासा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर तिचा पाकिस्तानी मित्र नसरुल्लाह याने केलाय. प्रेमप्रकारणाच्या शंकांना पूर्ण विराम देत तिचा मित्र म्हणाला की अंजू २० ऑगस्टला तिचा व्हिसा संपताच ती भारतात परतेल. ती त्याच्या कुटुंबातील महिलांसोबत आहे.
नसरुल्लाह म्हणाला की अंजूशी लग्न करण्याचा काहीही विचार नाही. दोघांची मैत्री २०१९मध्ये फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. पेशावरच्याजवळ ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्ह्यातील कुलशो गावातून त्याने फोन करत माध्यमांशी संवाद साधला आणि अंजू पाकिस्तानात आल्याची बातमी त्यांना दिली. त्याने पुढे हेही सांगितलं की त्यांचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाहीये.
घरातील एका वेगळ्या खोलीत राहतीये अंजू
अंजूच्या पाकिस्तानी मित्राने सांगितलं की व्हिजा संपल्यानंतर २० ऑगस्टला अंजू आपल्या देशात परतेल.ती कुटुंबातील महिला सदस्यांसोबत वेगल्या खोलीत राहत आहे. भारताची अंजू पाकिस्तानी व्हिजा घेऊन आपला मित्र नसरुल्लाह याला भेटण्यासाठी खायबर पख्तुनखा प्रातांतील दीर जिल्ह्यात पोहोचली. अंजू मुळची उत्तरप्रदेशमध्ये राहणारी आहे. लग्नानंतर ती नवऱ्याबरोबर राजस्थानमध्ये राहत आहे.
'मी वाघा बॉर्डरमधून पाकिस्तानला आले'
या प्रकरणात अंजूने सांगितलं होतं की ती पाकिस्तानात फिरण्यासाठी गेलेली आहे. तिने कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलंय. सर्व गोष्टी योजनाबद्ध पद्धतीने केल्या गेल्या आहेत. तिने सांगितले की तिला एका लग्नात सामील व्हायचं होतं.
तु भिवाडीमधून पाकिस्तानला कशी पोहोचली? या प्रश्नावर अंजू म्हणाली की,"मी वाघा बॉर्डरने पाकिस्तानला पोहोचले.आधी भिवाडीवरुन दिल्लीला गेले. नंतर अमृतसरला पोहोचले. त्यानंतर वाघा बॉर्डरवरुन पाकिस्तानला पोहोचले."
मी पुन्हा येईन, इकडे सुरक्षित आहे
पाकिस्तानमध्ये कुणाकडे थांबली आहेस?यावर अंजू म्हणाली की तिकडे तिचा एक मित्र आहे. त्याच्या कुटुंबाशी चांगली गप्पा होतात. यावेळी तिने सांगितले की त्यांची मैत्री दोन वर्षाआधी झाली होती. माझी तुलना सीमा हैदरशी करणं एकदम चुकीचं आहे. मी पुन्हा येणार आहे आणि मी इकडे पूर्णपणे सुरक्षित आहे, असे अंजूने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.