केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी 8 डिसेंबरला बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळं त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं, तेव्हापासून त्यांनी खाणंपिणं बंद केलं होतं.
Keshari Nath Tripathi Passes Away : उत्तर प्रदेश विधानसभेचे (Uttar Pradesh Vidhansabha) माजी अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी (Keshari Nath Tripathi) यांचं निधन झालं. ते बरेच दिवस आजारी होते.
प्रयागराज येथील राहत्या घरी आज पहाटे 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशरीनाथ त्रिपाठी हे भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते होते. यूपीच्या राजकारणात त्यांची वेगळी ओळख होती. मुलगा नीरज त्रिपाठी यांनी त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिलाय. नीरज त्रिपाठी यांनी सांगितलं की, 'वडिलांवर घरी उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.'
केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी 8 डिसेंबरला बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळं त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झालं होतं, तेव्हापासून त्यांनी खाणंपिणं बंद केलं होतं. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. 30 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना प्रयागराज शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणलं. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
केशरीनाथ त्रिपाठी यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1934 रोजी झाला. व्यवसायानं वकील असलेल्या केशरीनाथ त्रिपाठी यांची गणना भाजपच्या बलाढ्य नेत्यांमध्ये होते. ते तीन वेळा यूपी विधानसभेचे अध्यक्ष होते. यासोबतच यूपी भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पक्षाला पुढं नेण्याचं काम केलं. या शिवाय, त्रिपाठी यांनी जुलै 2014 ते जुलै 2019 या कालावधीत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.