Anurag Thakur China-Congress Link Sakal
देश

News Click वर भाजपचे गंभीर आरोप; काँग्रेस चीनसोबत भारतविरोधी अजेंडा राबवत असल्याचा केला दावा

China-Congress Link: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : काँग्रेस आणि न्यूज क्लीक या न्यूज पोर्टलचा संबंध असल्याचं सांगत या वेब पोर्टलकडून देशविरोधी अजेंडा राबवला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपनं केला आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले. त्याचबरोबर चीनकडून या न्यूज पोर्टलला फंडिंग होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (Serious allegations on News Click by BJP Claiming Congress is pursuing an anti India agenda with China)

राहुल गांधी यांच्या नकली मुहब्बत की दुकानं मध्ये चीनी सामान स्पष्टपणे दिसू लागलं आहे. इंडिया आघाडीचे नेते आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले समर्थन करणारे लोक कधीही भारताचं हिताचा विचार करत नाही. भारत कसा कमजोर होईल, भारताचं कसं नुकसान होईल हाच विचार हे लोक करत आहे, असे अनेक गंभीर आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केले. (Marathi Tajya Batmya)

न्यूज क्लीकला चीनकडून फंडिंग

न्यूज क्लीक या न्यूज पोर्टलवर गंभीर आरोप करताना अनुराग ठाकूर म्हणाले, चीनच्या ग्लोबल मीडिया संस्थानकडून या भारतीय न्यूज पोर्टलला पैसा पुरवण्यात आला आहे. जेव्हा या वेबसाईटच्या कार्यालयावर छापे पडले तेव्हा हे समोर आलं की, एका परदेशी नागरिक नेविल राय सिंघमनं याला पैसा पुरवला आहे.

तर या नेविल रायला चीन पैसा पुरवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. याचा संबंध कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या प्रोपोगंडा विभागाशी आहे. हे लोक अँटी इंडिया आणि ब्रेक इंडिया कँपेन चालवतात, असे अनेक आरोपही त्यांनी केले आहेत. (Latest Marathi News)

नेविल रॉय, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचा संबंध?

नेविल रॉय आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांचे संबंध सांगताना न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टचा दाखला अनुराग ठाकूर यांनी दिला. त्यांनी म्हटलं, याला त्या वृत्तपत्रांनी दुजोरा दिला आहे, ज्यांच्याबाबत काँग्रेस मोठंमोठ्या गोष्टी सांगत असते. आम्ही २०२१ मध्ये न्यूज क्लीकच्याबाबतीत खुलासा केला होता.

चीननं नरेटिव्ह स्थापित करण्यासाठी मोफत न्यूजच्या नावाखाली फेक न्यूज वाचकांसाठी देत होतं. तसेच काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष अभिव्यक्ती स्वांतत्र्याच्या नावाखाली त्यांच्यासोबत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT