हा ढोंगी बाबा महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करायचा. 5 जानेवारीला फतेहाबाद न्यायालयानं त्याला 14 वर्षांची शिक्षा सुनावली.
Jalebi Baba News : हरियाणातील (Haryana) जिलेबी बाबा 'सेक्स स्कँडल'मध्ये दोषी ठरलेल्या बिल्लुराम उर्फ अमरपुरीची कहाणी ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. या बहाद्दरानं एक-दोन नव्हे तर तब्बल 120 महिलांना चहा पाजवून त्यांच्यावर बलात्कार केला.
हा ढोंगी बाबा महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करायचा. 5 जानेवारीला फतेहाबाद न्यायालयानं त्याला 14 वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय, 35 हजारांचा दंडही ठोठावला आहे. तर, काल 10 जानेवारी रोजी त्याला शिक्षा जाहीर झाली आहे. शेकडो महिलांवर बलात्कार करणाऱ्या बाबानं न्यायाधीशांसमोर रडत दयेची याचना केली.
आरोपी जिलेबी बाबाचे 120 हून अधिक अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. हा बाबा चहामध्ये नशेच्या गोळ्या मिसळून महिलांना बेशुद्ध करायचा. यानंतर तो त्यांच्यावर बलात्कार करायचा. या घृणास्पद कृत्याचे व्हिडिओही तयार करण्यात आले. 6 पीडित महिलांनी न्यायासाठी याचना केल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या सर्वांनी कोर्टात हजर राहून बाबाचं चारित्र्य जगासमोर उलगडलं.
बिल्लुराम बाबा हा बालकनाथ डेरामधील बाबा होता. 2018 मध्ये पहिल्यांदा त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. स्टेशन प्रभारींच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून आलेल्या एमएमएसच्या आधारे पोलिसांनी ही तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी बाबावर कारवाई सुरू केली. यादरम्यान असे 120 व्हिडिओ सापडले. यामध्ये तो महिलांसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवताना दिसत आहे.
पोलीस तपासानुसार, 'आश्रमात उपचारासाठी येणाऱ्या महिलांची जिलेबी बाबा शिकार करायचा. तो त्यांना गळ घालायचा आणि नशेची गोळी खाऊ घालायचा. यानंतर तो महिलांशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवायचा आणि व्हिडिओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करायचा.'
बिल्लू राम 2002 मध्ये पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील अमरवीर तोहना यांच्या संपर्कात आला. नेहरू मार्केटमध्ये त्यानं जिलेबी बनवण्यास सुरुवात केली. व्यवसाय चांगला चालला होता. या दरम्यान त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर तो एका तांत्रिकाच्या संपर्कात आला, त्यानं त्याला तांत्रिक विद्या शिकवली. यानंतर तो दोन वर्षे गायब होता. वापळला परतल्यावर त्यानं बाबा बालकनाथाचं मंदिर बांधलं. इथं तो आपल्या मुलांसह राहू लागला. त्यानं आपलं नावही बदललं. तंत्राच्या नावानं मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली. येथूनच त्यानं महिलांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.