Hindu Activist Chaitra Kundapur Arrested esakal
देश

भाजपच्या उमेदवारीचे आश्वासन देऊन पाच कोटींची फसवणूक; हिंदुत्ववादी कार्यकर्त्या चैत्रासह सात जणांना अटक

स्वामीजीने आश्वासन देऊन दीड कोटी घेतले.

सकाळ डिजिटल टीम

२०२२ मध्ये भाजप कार्यकर्ता प्रसाद बैंदूर (आरोपी क्रमांक ८) याने चैत्रा कुंदापुरा हिच्याशी त्यांची ओळख करुन दिली.

बंगळूर : सेंट्रल क्राईम ब्रँच (CCB) पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्या चैत्रा कुंदापूर (Chaitra Kundapur) हिला बैंदूर विधानसभा मतदारसंघासाठी (Byndoor Assembly Constituency) भाजपचे तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

बंगळुरमधील उद्योजक बैंदूरचे मूळ रहिवासी असलेले भाजपचे इच्छुक गोविंदा बाबू पुजारी यांच्याकडून चैत्रा आणि इतर सात जणांनी पाच कोटी रुपये घेतले होते. चैत्राला १२ सप्टेंबरला उडुपी कृष्ण मठाजवळ अटक केली होती. बंगळुरचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) अब्दुल अहद यांनी सांगितले की, इतर सहा संशयितांनाही सीसीबीने अटक केली आहे.

आठ सप्टेंबर रोजी बंगळूरमधील बांदेपाळ्य पोलिसांकडे पुजारी यांनी तक्रार केली. २०२२ मध्ये भाजप कार्यकर्ता प्रसाद बैंदूर (आरोपी क्रमांक ८) याने चैत्रा कुंदापुरा हिच्याशी त्यांची ओळख करुन दिली. पुजारी यांना चिक्कमगळूर येथील भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस गगन कदूर (आरोपी क्रमांक २) यांच्या संपर्कात आणले.

ते चार जुलै २०२२ रोजी चिक्कमगळूर येथे कदूर यांना भेटले. कदूर यांनी त्यांची ‘विश्वनाथजी’ नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. चैत्रा आणि इतरांनी त्यांची ओळख होस्पेट येथील हिरेहडगली येथील संस्थान मठातील अभिनव हलश्री स्वामीजी यांच्याशी करून दिली. स्वामीजीने आश्वासन देऊन दीड कोटी घेतले.

२३ ऑक्टोबर रोजी ते बंगळूरमध्ये ‘नाईक’ (आरोपी क्रमांक ५) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीला भेटले आणि भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचा सदस्य असल्याचा दावा केला. ‘नाईक’ याने पुजारी यांना तिकीट देण्याचे आश्‍वान दिले. नाईक यांने २९ ऑक्टोबर २०२२ रोजी उर्वरित तीन कोटी घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

SCROLL FOR NEXT