High Court esakal
देश

जर महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही - कोर्ट

याप्रकरणात कोर्टानं आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जर महिलेनं लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे कपडे परिधान केले असतील तर आरोपीवर प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी टिपण्णी केरळमधील एका स्थानिक कोर्टानं केली आहे. लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिव्हिक चंद्रन यांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना कोर्टानं ही टिपण्णी केली आहे. (Sexual harassment charge will not stand when woman was wearing sexually provocative dresses says Kerala court)

चंद्रन यांनी यासंदर्भात तक्रारदाराचे फोटो आपल्या याचिकेसोबत कोर्टात सादर केले होते. त्यावरुन कोर्टानं त्यांना १२ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला. तत्पूर्वी २ ऑगस्ट त्यांच्यावर दाखल असलेल्या दुसऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला होता.

दरम्यान, तक्रारदार महिलेच्या फोटोचा संदर्भ देत कोर्टानं म्हटलं की, महिलेनं असे कपडे परिधान केले आहेत ज्यामुळं एखाद्यामध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. त्यामुळं सेक्शन ३५४ अ नुसार प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही.

चंद्रन यांनी आरोप केला होता की, महिलेने आपल्याविरोधात खोटी तक्रार केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये घडलेल्या कथीत घटनेचा संदर्भ देत चंद्रन म्हणाले, कार्यक्रमात तक्रारदार तिच्या प्रियकरासह इतर अनेकांची उपस्थिती होती पण इथं उपस्थित असलेल्या एकानेही आपल्याविरोधात अशी तक्रार केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT