मुंबई: बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरु असून आता पुढचं टार्गेट शाहरुख खान आहे, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला. शाहरुख खानला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. शाहरुख खानला अडकवण्यात आलं, असे सांगत नवाब मलिक (nawab malik) यांनी कॉर्डीलिया क्रूझ रेव्ह पार्टी (rave party) प्रकरणात नवीन खळबळजनक खुलासा केला आहे. तसेच . क्रूझवरुन NCB ने आठ नाही, तर ११ जणांना ताब्यात घेतलं होतं असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
NCB पब्लिसिटीसाठी लोकांना बोलावत आहेत. रिया चक्रवर्ती असेल, दीपिका पादुकोण असेल, ती भारती नावाची बाई असेल,अर्जुन रामपाल असेल, किती लोकांना बोलवून दिवसभर मीडियामध्ये बातमी चालवण्यात आली, शाहरुख खान हा पुढचा टार्गेट आहे. एक महिन्यापासून सांगण्यात येत होतं, पुन्हा त्याच्या मुलाला गोवण्यात आलं, अडकवण्यात आलं, हे सगळं फर्जीवाडा आहे, असा दावा मलिकांनी केला.
'त्या' तिघांनाच NCB ने का सोडलं? - नवाब मलिक
"ज्या दिवशी क्रूझवर NCB ने छापे टाकले, त्यावेळी समीर वानखेडे (sameer wankhede) 8 ते 10 लोकांना ताब्यात घेतलं असं म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे. असं नवाब मलिक म्हणाले. एक तर आठ लोकांना ताब्यात घेतलं असेल किंवा दहा. पण सत्य वेगळं आहे. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या" असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या अकरा जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवला या तिघांना सोडण्यात आलं. या तिघांना का सोडण्यात आलं? असा सवाल नवाब मलिक यांनी विचारलं आहे. रिषभ सचदेव हा भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करावी
"रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना का सोडलं? या प्रश्नाचं उत्तर समीर वानखेडेंनी द्यावं. 1300 लोक असलेल्या जहाजावर रेड टाकली. त्यात 11 लोकांना ताब्यात घेतलं. त्यांना NCB कार्यालयात आणले. मग या तीन लोकांना सोडण्यासाठी कुणाचे फोन आले? दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले" असा आरोप नवाब मलिक यांनी केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी असे देखील मलिक यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.