World 100 Most Influential People: टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रतिभावान व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जगातील उद्योगपतींपासून ते गायक, राष्ट्रपती, कलाकार, लेखक यांचा समावेश करण्यात आला आहे.
टाईम मासिकाच्या या यादीत अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक एसएस राजामौली तसेच भारतीय-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
टाईम मॅगझिन 100 सर्वात प्रतिभावान लोक अनेक पॅरामीटर्सवर निवडले जातात. नियतकालिकानुसार, ही यादी हवामान आणि सार्वजनिक आरोग्यापासून लोकशाही आणि समानता या घटकांच्या आधारे ठरवली जाते.
आणखी काही पॅरामीटर्स स्पष्ट करताना, टाईम मासिकाने सांगितले की या यादीमध्ये ज्या लोकांचा समावेश आहे त्यात प्रसिद्ध ते माहित नसलेल्या लोकांचा समावेश आहे.
कोणत्या क्षेत्रांचा समावेश होता :
टाइमच्या या यादीत, जागतिक नेते आणि स्थानिक कार्यकर्ते, कलाकार आणि खेळाडू आणि वैज्ञानिक विविध क्षेत्रातील अनेक लोकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांच्या नवीन यादीमध्ये विक्रमी 16 पर्यावरणवाद्यांचा समावेश आहे, ज्यात हवामान-समर्थक जागतिक नेत्यांचा समावेश आहे.
या यादीत अनेक पत्रकारांचाही समावेश आहे :
टाईम 100 च्या यादीमध्ये तीन पत्रकारांचा समावेश आहे, ज्यात इराणी पत्रकार इलाहे मोहम्मदी आणि निलोफर हमीदी तसेच वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर इव्हान गेर्शकोविच यांचा समावेश आहे, ज्यांना रशियाबद्दल त्याच्या वार्तांकनासाठी खोट्या खटल्याचा सामना करावा लागत आहे.
एलोन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती :
टाइम मॅगझिनमध्ये विशेष स्थान निर्माण करणारे एलोन मस्क सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती 188.5 अब्ज डॉलर आहे.
ते टेस्ला आणि ट्विटरचे सीईओ देखील आहेत आणि त्यांच्या ट्विट्स आणि निर्णयांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.