देश

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

संतोष कानडे

Swami Avimukteshwaranand Saraswati on UCC: भारतीय जनता पक्षाने ज्या समान नागरी कायद्याला २०२४च्या निवडणुकीमध्ये निवडणूक अजेंडा बनवला होता, त्यावरुन उत्तराखंडच्या ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठं विधान केलं आहे.

'न्यूज तक'सोबत बोलताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, समानतेची गोष्ट ऐकायला बरी वाटते. परंतु हे योग्य नाही, असं मला वाटतं. कुणी याच्याशी सहमत आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनाच समान करण्याचा प्रयत्न केला तर कुणालातरी तोडून छोटं करावं लागेल नाहीतर कुणालातरी जॅक लावून उंच करावं लागेल. तेव्हाच सगळे समान होतील.. पण अशी समानता शक्यत नाही.

शंकराचार्य पुढे म्हणाले की, समानतेच्या नावाखाली आपल्याला धर्मशास्त्रातले नियम अंगिकारता येत नसतील तर आपल्याला हे स्वीकारता येणार नाही. त्यामुळे आपल्याला पर्सनल लॉ नियमाप्रमाणे जीवन जगण्याची मुभा पाहिजे. जसं मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे लोक नियम पाळतात तसंच आपल्यालाही असाच कायदा गरजेचा आहे. मला यूसीसी अजिबात मान्य नाही, आधीच धर्मामध्ये खूप जास्त हस्तक्षेप झालेला आहे.

मोहम्मद अली जिन्नांचं नाव घेऊन काय म्हणाले शंकराचार्य?

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, सर्वच धर्माच्या लोकांची सहमती असती तर भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले नसते. तेव्हा अनेक प्रयत्न झाले परंतु लोक सहमत झाले नाहीत. त्यामुळे एका ठिकाणी एकसारखे लोक रहायला गेले.

मिळून राहाणं आणि आपापसात भांडण करणं कुणासाठीच योग्य नाही. हिंदुस्थानमध्ये मुस्लिम राहाता कामा नयेत आणि पाकिस्तानमध्ये हिंदू राहाता कामा नयेत, असं माझं म्हणणं आहे. आम्ही याबाबतीत मोहम्मद अली जिन्नांशी सहमत आहोत. दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापल्या वसाहतींमध्ये राहिलं पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT