Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
देश

Sharad Pawar Beed: पवारांची बीडची सभा ठरवणार पुढची दिशा, सगळे संभ्रम होणार दूर; अजित पवार घेणार मोठा निर्णय

Sharad Pawar Beed Sabha: अजित पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक सायंकाळी पाच वाजता देवगिरी बंगल्यावर

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा होणार आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात शरद पवारांची सभा होणार आहे. यामुळे शरद पवार हे यावेळी नक्की काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांची ही सभा झाल्यानंतर आज अजित पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक सायंकाळी पाच वाजता देवगिरी बंगल्यावर घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शरद पवार बीडच्या सभेत आज नक्की काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष असल्यामुळे शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर अजित पवार गटाच्या पुढच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी समोर आणली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी या दोघांची जवळीक संपूर्ण महाराष्ट्राला संभ्रमात टाकणारी आहे. यातच नुकतीच अजित पवार यांनी देखील शरद पवार यांची गुप्त भेट घेतली होती.

यामुळे हा संभ्रम अजूनच वाढला आहे. मात्र शरद पवारांच्या आजच्या बीडच्या सभेनंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे. यामुळेच की काय अजित पवार गटातील नेत्यांचेही शरद पवारांच्या आजच्या सभेकडे प्रामुख्याने लक्ष असणार आहे.

शरद पवार यांची सभा होताच आणि त्यांची भूमिका स्पष्ट होताच लगेच सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांनी आपल्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. यामुळे अजित पवार गट देखील आपली आगामी काळातील रणनीती या बैठकीमध्ये ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Parli Vidhan Sabha: परळीत चार मतदारकेंद्रांवर धुडगूस; EVM मशीन्स फोडले, केंद्राध्यक्षाला बेदम मारहाण

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मुंबई शहर जिल्ह्यात दहा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान

Assembly Elections Voting: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांचे Exit Polls कधी येणार? जाणून घ्या तारीख आणि वेळ…

Voting Percentage: दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर; महाराष्ट्र की झारखंड, मतदानात कोण ठरला मोठा भाऊ?

Adani Group: अदानी समूह देणार रिलायन्सच्या जिओ वर्ल्ड सेंटरला टक्कर; मुंबईत उभारणार सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर

SCROLL FOR NEXT