Sharad Pawar group aggressive on ajit pawar An praful patel resignation demand was made after meeting the Chairman of the Rajya Sabha jagdeep dhankhar knp94 
देश

शरद पवार गट अजित पवार गटाविरोधात आक्रमक; थेट राज्यसभेच्या सभापतींची भेट घेत केली महत्त्वाची मागणी

शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं यासाठी थेट राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची शरद पवार गटाकडून भेट घेण्यात आली आहे. (Sharad Pawar group aggressive on ajit pawar An praful patel resignation demand was made after meeting the Chairman of the Rajya Sabha jagdeep dhankhar knp94)

प्रफुल्ल पटेल यांनी 4 महिन्यांपूर्वी 10व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून देखील ती न करण्यात आल्याने शरद पवार गटाने ही भेट घेतली असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार हटाच्या या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांची उपस्थिती होती.

प्रफुल पटेल यांच्यासह इतर अजित पवार गटाला अपात्र ठरवण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाची आहे. यासंदर्भात वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून याआधी आठवण देखील करून देण्यात आली होती. पण, यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्षपणे राज्यसभेच्या सभापतींची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून दोन गट पडले आहेत. यातील अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये संघर्ष सुरु असून पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. पक्ष आणि चिन्ह आपलाच असल्याचा दावा करण्यासाठी दोन्ही गटाने जोरदार तयारी केली आहे. दोन्ही गटाकडून आक्रमकपणे केंद्रीय निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली जात आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT