AK Antony Rajnath Singh and Sharad Pawar Sakal
देश

शरद पवार, अँटनी यांना सीमेवरच्या स्थितीची दिली माहिती; राजनाथ सिंह

लष्कराने ही बातमी खोडसाळ असल्याचा खुलासा केला आहे. मात्र, विरोधी पक्षांकडून भारत चीन सीमेवरील परिस्थितीबाबत सरकारला सवाल केले जात आहेत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Rainy Session) सोमवारपासून (ता. १९) सुरवात होत असताना चीनशी सीमावादाचे (China Border Dispute) पडसाद संसदेत उमटण्याची शक्यता पाहता संरक्षण मंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी माजी संरक्षण मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी (AK Antony) यांना सीमेवरील नेमक्या स्थितीची माहिती दिली. (Sharad Pawar Informed Antony Situation Border Rajnath Singh)

पॅंगांग त्सो सरोवराच्या परिसरात चिनी लष्कराची घुसखोरी आणि गलवान खोऱ्यातील संघर्षानंतरची सैन्य माघारीबाबत झालेली सहमती, निवडक सैन्य माघारीनंतर चीनने चालविलेला आडमुठेपणा, सीमेवरील शांततेखेरीज दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होणार नसल्याचा भारताने चीनला दिलेला इशारा अशी पार्श्वभूमी असताना पुन्हा एकदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याशी भारतीय लष्कराची एक चकमक घडल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती.

लष्कराने ही बातमी खोडसाळ असल्याचा खुलासा केला आहे. मात्र, विरोधी पक्षांकडून भारत चीन सीमेवरील परिस्थितीबाबत सरकारला सवाल केले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार तसेच कॉंग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर राजनाथसिंह यांनी आज दोन्ही नेत्यांना माहिती दिली. आजच्या बैठकीदरम्यान चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे उपस्थित होते. सुमारे सव्वा तास चाललेल्या बैठकीत दोन्हीही नेत्यांना सीमेवरील नेमक्या परिस्थितीची तपशीलवार माहिती देण्यात आल्याचे समजते.

पीयूष गोयल पवार भेट

दरम्यान, राज्यसभेचे नवनिर्वाचित सभागृह नेते पीयूष गोयल यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा तपशील कळू शकलेला नाही. महाराष्ट्रातील त्रिपक्षीय सरकारमध्ये विसंवाद वाढल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज लढविले जात असताना, संसद अधिवेशनापूर्वी सभागृह नेते या नात्याने अधिवेशनापूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत ही शिष्टाचार भेट असल्याचे असल्याचे गोयल यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून सांगण्यात आले. शरद पवार यांच्या सोबतच गोयल यांनी कॉंग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, आनंद शर्मा यांचीही भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT