Sharad Pawar 
देश

NCP Crisis: "शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात"; अजित पवार गटाचा निवडणूक आयोगात गंभीर आरोप

Sandip Kapde

NCP Crisis: भारतीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावरील दाव्यांबाबतच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाचे नेतृत्व शरद पवार आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि शरद पवार यांच्यातील वादाच्या दरम्यान अजित पवार यांनी जुलैच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा केला. त्यानंतर शरद पवार गट देखील आयोगात गेला होता.

अजित पवार गटाने आयोगात गंभीर आरोप केला आहे. शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा आरोप अजित पवार गटाने यावेळी केला. जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली, असेही अजित पवार गटाने म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील ५३ पैकी ४३ आमदार आमच्या गटाकडे आहेत. विधान परिषदेतील ९ पैकी ६ आमदारही आमच्या बाजूने आहेत. याशिवाय लोकसभेतील ५ पैकी १ व राज्यसभेतील ४ पैकी १ खासदार आपल्या गटात असल्याचा दावाही अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादात केला आहे.

अजित पवार यांच्यासह ९ आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारं शरद पवार गटाचं पत्र बेकायदेशीर आहे. मुख्य प्रतोद आमच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात. हा मनमानी पद्धतीचा कारभार आहे. हे लोकशाहीला धरून नाही, असेही अजित पवार गटाने म्हटले आहे.

शरद पवार गटाचा युक्तिवाद काय?

शरद पवार यांच्या गटाकडून वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. अजित पवार गटाची भूमिका पक्षाच्या विचाराच्या विरोधात आहे. अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही.

अजित पवार यांच्यासह ९ आमदारांवर कारवाई करण्यासाठी अध्यक्षांकडे पत्र दिले आहे.

पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजेत. अजित पवार गटाने पक्षाची घटना पाळली नाही. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी आमच्या बाजून आहे, असे अभिषेक मनू सिंघवी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT