sharad pawar slam bjp over all accused acquitted in naroda gam massacre case 2002 gujarat riots  esakal
देश

Sharad Pawar : हल्लाच झाला नाही तर हत्या कशा? गुजरात दंगलीतील आरोपींच्या सुटकेवर पवारांचं मोठं विधान

रोहित कणसे

गुजरात दंगल प्रकरणातील नरोडा पाटीया हत्याकांडातील प्रमुख आरोपी भाजपाच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी, विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह ६९ आरोपींची काल निर्दोष मुक्तता करण्यात आली. अहमदाबादच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (२१ एप्रील) भाजपवर कडाडून टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घाटकोपर येथील मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी हा सत्तेचा गैरवापर असल्याचे सांगत भाजपवर जोरदार टीका केली. म्हणजे त्या वेळेला ज्या लोकांची हत्या झाली ती हत्या कशाने झाली? असेही शरद पवार म्हणाले आहेत.

पवारांची भाजपवर जोरदार टीका

रोज काहीतरी घडतंय, काही वर्षापूर्वी गुजरातमध्ये अल्पसंख्यांकाच्या हत्या झाल्या, हल्ले झाले. काही लोक मृत्यूमुखी पडले आणि ही जातीय दंगल होती. या जातीय दंगलीच्या पाठीमागे गुजरातमधील सत्ताधारी पक्ष होता.

त्यामध्ये ज्यांना अटक झाली त्यामध्ये एक महिला होत्या, ज्या आमदार होत्या, बाकीचे मंत्री होते अन्य त्यांचे सहकारी होते. इतके दिवस ती केस चालली. या लोकांना अटक झाली आणि लगेचच त्यांना जामीन देण्यात आला. केस वर्षांनुवर्षे चालली आणि आता काल हायकोर्टाचा निर्णय आला आणि हे सगळे लोक निर्दोष सुटले.

कायदा आणि संविधान याची सुध्दा हत्या

पवार पुढे बोलताना म्हणाले की, म्हणजे त्या वेळेला ज्या लोकांची हत्या झाली ती हत्या कशाने झाली? जर तुम्ही हल्लाच केला नाही, तर हत्या होईल कशी? हत्या करून हे निर्दोष म्हणून सोडले जातात. एका दृष्टीने ज्यांची हत्या झाले ते ही गेले आणि या देशाचा कायदा आणि संविधान याची सुध्दा हत्या झाली, याचा सुध्दा मर्डर झाला ही गोष्ट कालच्या निकालावरून स्पष्ट झाली आहे असे शरद पवार म्हणाले.

हे सगळं जे घडलं ते आज सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्या सत्तेचा वापर ज्या पध्दतीने करत आहेत त्यामाध्यमातून हे होतं असतं असे शरद पवार म्हणाले.

प्रकरण काय आहे?

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. २७ फेब्रुवारी २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीत इतर ९ ठिकाणीही दंगल झाली होती. यापैकी नरोडा गाम येथे झालेल्या हिंसाचारात मुस्लिम मोहल्ला आणि कुंभार वास येथील घरांना पेटवण्यात आले होते. यावेळी ११ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणाचा खटला तब्बल १३ वर्षे सुरू राहिला. यावेळी ५२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली . या न्यायालायने ५ एप्रिल रोजी सुनावणीची कार्यवाही पूर्ण केली होती. या खटल्यातील ८६ आरोपींपैकी १७ आरोपींचे सुनावणीदरम्यान निधन झाले. त्यामुळे उर्वरित ६९ आरोपींविरोधात खटला सुरू होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT