Shashi Tharoor  Sakal
देश

Spelling Mistake : तुमची शिकवण JNU मध्ये उपयोगी पडेल

इंग्रजीत प्रभूत्व असणाऱ्या थरूर सतत नवनवे इंग्रजी शब्द शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शशी थरूर यांच्या ट्वीमधील इंग्रजीच्या स्पेलिंगची चूक शोधल्यानंतर चर्चे आलेल्या रामदास आठवले यांच्या ट्वीटला शशी थरून यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हंटलय की, ''मी चुकलेले स्पेलिंग सुधारले आहे, निष्काळजी टायपिंग हे चुकीच्या इंग्रजीपेक्षा मोठे पाप आहे, असे म्हंटले आहे. तुमच्या या शिकवणीचा JNU मधील विद्यार्थांना फायदा होऊ शकतो असे ट्वीट थरूर यांनी केले आहे. (Shahsi Tharoor Athawale Tweet War )

नेमकं काय घडलं होतं

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्पावर स्पष्टीकरण दिलं. जवळपास दोन तास ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यावर ट्वीट करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा एक फोटो शेअर केला. यामध्ये आठवले अवाक् होऊन सीतारामन यांच्याकडे बघत असल्याचं टिपण्यात आलंय. (Ramdas Athawale tweets on Shashi Tharoor)

अर्थमंत्र्यांचे दावे आठवलेंच्याही पचनी पडले नाहीत, असं ट्वीट करत थरूर यांनी टोला लगावला. पण त्याला आठवलेंनी प्रत्यतुत्तर देत शशी थरूर यांच्या इंग्रजीच्या चुका काढल्या. यावर त्यांनी ट्वीटही केलंय. खासदार शशी थरूर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यात मजेदार ‘ट्वीट वॉर’ पाहायला मिळालं. एकीकडे थरूर यांनी संसदेतील फोटो पोस्ट करताना आठवले यांचा उल्लेख केला, तर काही वेळाने केंद्रीय मंत्र्यांनीही थरूर यांना योग्य इंग्रजीत लिहिण्याचा सल्ला दिलाय.

आठवले यांनी थरूर यांच्या ट्विटमधील चुकांकडे लक्ष वेधलं. "प्रिय शशी थरूर जी, असं म्हणतात की अनावश्यक दावे आणि विधानं करताना चुका होतात. तुमच्या ट्वीटमध्ये ‘Bydget’ नाही तर BUDGET होईल, आणि rely ऐवजी ‘reply’ होईल! पण आम्ही समजू शकतो!”, अशा आशयाचं ट्वीट आठवलेंनी केलं. यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे.

इंग्रजीत प्रभूत्व असणाऱ्या थरूर सतत नवनवे इंग्रजी शब्द शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक इंग्रजी संज्ञा अभ्यासकांना विचार करायला लावतात. आता आठवलेंनी त्यांच्या चुका काढल्याने नेटकरी अॅक्टिव्ह झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT