Shashi Tharoor X Post On Bangladesh Riots Esakal
देश

Shashi Tharoor X Post: "बांगलादेशी दंगलखोर माफीच्या लायकीचे नाहीत," शशी थरूर का संतापले?

Bangladesh Violence: बांगलादेशातील राजकीय गोंधळ आणि सत्तापालटानंतरही देशातील हिंसक निदर्शने कमी झालेली नाहीत. देशाच्या विविध भागातून हिंसेच्या विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत.

आशुतोष मसगौंडे

बांगलादेशातील राजकीय गोंधळ आणि सत्तापालटानंतरही देशातील हिंसक निदर्शने कमी झालेली नाहीत. देशाच्या विविध भागातून हिंसेच्या विविध प्रकारच्या घटना समोर येत आहेत.

आंदोलक राष्ट्रीय स्मारकांना लक्ष्य करत आहेत. मुजीबनगर येथील 1971 च्या हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी असलेले पुतळे पाडण्यात आल्यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली असून बांगलादेशच्या अंतरिम सरकारला कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्याची विनंती केली आहे.

शशी थरूर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "1971 च्या शहीद स्मारक संकुलातील पुतळ्यांची ही अवस्थाप पाहून वाईट वाटले, ज्याची भारतविरोधी दंगलखोरांनी तोडफोड केली. काही आंदोलकांचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे. ते भारतीय सांस्कृतिक केंद्र, मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर हल्ले करतल आहेत."

थरूर पुढे म्हणाले, "अंतरिम सरकार सर्व बांगलादेशी, प्रत्येक धर्माच्या हितासाठी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी तातडीची पावले उचलेल अशी अपेक्षा आहे.. या अशांत काळात भारत बांगलादेशच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे, पण अशा अराजकतेला कधीही माफ करता येणार नाही."

शेजारील देशातील सद्यस्थितीबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, बांगलादेशातील जनतेला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा संकेत द्यायचा आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभे आहोत. यात आमचा कोणताही छुपा रस नाही.

शेख हसीना आणि बांगलादेशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, 'हा अगदी स्पष्टपणे शेख हसीना युगाचा अंत आहे, यात शंका नाही. त्या 76 वर्षांच्या आहेत आणि मला वाटत नाही की त्यांनी राजकीय शरन घेतले असताना त्या पुन्हा सत्तेत येण्याचा विचार करत असतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT