court 
देश

Crime News: भर कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने जमिनीवर आपटलं; न्यायमूर्तीही झाले सुन्न

महिलेने आपल्या १३ महिन्याच्या मुलाला कोर्टामध्ये जमिनीवर आपटलं होतं.

कार्तिक पुजारी

भोपाळ- मध्य प्रदेश हायकोर्टाने एका महिलेला दिलासा देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने महिलेच्या विरोधातील अफआयआर रद्द करण्यास नकार दिला. महिलेने आपल्या १३ महिन्याच्या मुलाला कोर्टामध्ये जमिनीवर आपटलं होतं. याप्रकरणी कोर्ट म्हणालं की, बाळाला जमिनीवर आपटणं हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. आरोपी महिलेविरोधात २०२२ मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिलेने कथितरित्या एका कोर्टाच्या दालनात बाळाला जमिनीवर फेकलं होतं. महिलेचे हे रुप पाहून न्यायमूर्ती देखील सुन्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या पोटगी संदर्भात याचिकेवर सुनावणी सुरु होती. आरोपी महिलेचे नाव भारती पटेल असं आहे. न्यायमूर्ती गुरपाल सिंह यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली.

न्यायमूर्ती म्हणाले की, 'बाळावर जमिनीवर फेकण्याचा महिलेला कोणताही अधिकार नाही. मुलाला मारण्याचा महिलेचा स्पष्ट हेतू होता. १३ महिन्याच्या बाळाला जमिनीवर टाकणे क्रूर प्रकार आहे.' आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी महिलेकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती. पण, कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला आहे.

महिलेने आपल्या दु:खासाठी बाळाला जबाबदार धरलं होतं. त्यामुळे तिने आपल्या बाळाला जमिनीवर फेकलं. महिलेने मुलाच्या दिशेने पेपरवेट देखील फेकून मारला होता. यावेळी ती म्हणाली होती की, 'मी आज तुला मारुनच टाकणार.' सुदैवाने पेपरवेट मुलाला लागला नव्हता. त्यामुळे बाळाचा जीव वाचला होता.

महिलेची पोटगी संदर्भात सुनावणी सुरु होती. त्यावेळी पती कोर्टात उपस्थित नसल्याने तिने आरडा-ओरड सुरु केला होता. तिने बाळाला जमिनीवर फेकलं अन् वारंवार सांगून देखील मुलाला उचलून घेतलं नाही. त्याला रडण्यापासून थांबवण्याचा देखील प्रयत्न केला नाही. कोर्टाने वारंवार सांगूनही महिलेने आपल्या आचरणात बदल केलेला नाही. सदर प्रकरणी सर्व तथ्य आणि परिस्थिती पाहून आपण सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन बाळगू शकत नाही. त्यामुळे याचिका फेटाळली जात आहे, असं न्यायमूर्तींनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT