Agra Red Fort Sakal
देश

Shiv Jayanti 2023: आग्र्याच्या लाल किल्ल्यात कार्यक्रमाला परवानगी नाकारली; संतप्त शिवप्रेमी कोर्टात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्र देऊनही पुरातत्व खात्याकडून परवानगी मिळालेली नाही.

सकाळ डिजिटल टीम

आग्रामध्ये लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उमटली आहे. संतापलेल्या शिवप्रेमींनी आता थेट दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. दरम्यान, याचविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांना पत्रही दिलं आहे.

आग्र्यामध्ये छत्रपती शिवरायांना औरंगजेबाकडून कैद कऱण्यात आलं होतं आणि त्यातून महाराजांची सुटका कऱण्याची ऐतिहासिक घटनाही घडली होती. याच घटनेला उजाळा देण्यासाठी आग्र्यात शिवजयंती साजरी करण्याचं शिवप्रेमींनी ठरवलं होतं. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रही दिलं होतं. पण तरीही पुरातत्व विभागाने परवानगी दिली नाही.

त्यामुळे हे प्रकरण अखेर हायकोर्टात गेलं आहे. पुरातत्व विभागाच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना या आधी परवानगी दिली मग शिवजयंती बाबत भेदभाव का असा सवालही या याचिकेतून विचारण्यात आला आहे.

हेही वाचा - पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

याआधी अदनान सामी आणि इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आग्र्याच्या किल्ला परिसरात झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या सोहळ्याला आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत, त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी द्यावी असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. मात्र तरीही परवानगी मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: कोपरी पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT