CA Exam sakal
देश

CA Exam : ‘सीए’ परीक्षेत शिवम मिश्रा देशात प्रथम;मुंबईतील किरण मनरल आणि घिलमन अन्सारी यांना तिसरा क्रमांक

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सनदी लेखापाल (सीए) अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील एक लाख १६ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यातर्फे सनदी लेखापाल (सीए) अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरातील एक लाख १६ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा दिली. त्यातील २० हजार ४४६ विद्यार्थी ‘सीए’ होण्यास पात्र ठरले आहेत. परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर नवी दिल्लीतील शिवम मिश्रा याने ८३.३३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, दिल्लीतील वर्षा अरोरा हिने ८० टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक, तर मुंबईतील किरण राजेंद्र सिंग मनरल आणि घिलमन सलीम अन्सारी यांनी ७९.५० टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. मेमध्ये ४८४ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये ‘सीए’च्या परीक्षेचा समावेश आहे.

सीए इंटरमिजिएट परीक्षेसाठी दोन लाख सहा हजार ४१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातून कुशाग्र रॉय (भिवंडी) ८९.६७ टक्के गुण मिळवीत राष्ट्रीय पातळीवर पहिल्या क्रमांकावर आहे, तर युग कारिया (अकोला) आणि यज्ञ चांडक (भाईंदर) ८७.६७ टक्के गुणांसह दुसऱ्या आणि मनित भाटिया (नवी दिल्ली), हिरेश काशिरामका (मुंबई) ८६.५० टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

‘सीए इंटरमिजिएट’चा निकाल

  • ग्रुप : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : टक्केवारी

  • ग्रुप १ : १,१७,७६४ : ३१,९७८ : २७.१५

  • ग्रुप २ : ७१,१४५ : १३,००८ : १८.२८

  • दोन्ही ग्रुप : ५९,९५६ : ११,०४१ : १८.४२

  • पुण्यातील ‘सीए’ अंतिम परीक्षेचा निकाल

  • ग्रुप : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले

  • ग्रुप एक : १,१०८ : ३२३

  • ग्रुप दोन : ६४९ : २२७

  • दोन्ही ग्रुप : ९११ : १८९

  • पुण्यातील ‘टॉपर’ :

  • विद्यार्थी : शहर रॅंक

  • रजत राठी : पहिला

  • तुषार धोंडे : दुसरा

  • अतिक बागबान : तिसरा

  • शिवानंद कोटगिरे : चौथा

  • प्रतीक राठोड : पाचवा

‘विकसित भारत घडविण्यात मोलाची भर पडेल’

‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए रणजित कुमार अगरवाल म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांची मेहनत, समर्पण आणि चिकाटीला खऱ्या अर्थाने मिळालेले फळ म्हणजे ‘सीए’ होण्यास पात्र ठरले हे आहे. देशातील चार लाखांहून अधिक सनदी लेखापाल असणाऱ्या कुटुंबात या विद्यार्थ्यांचाही समावेश झाला आहे. हे सनदी लेखापाल वित्त आणि लेखा (अकांउंटिंग) क्षेत्रात आपले योगदान देतील. तसेच ‘विकसित भारत’ होण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि विकासात मोलाची भर टाकतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT