मुंबई : शेकडो मुस्लीम महिलांचे फोटो बुल्ली बाई (Bulli Bai) नावाच्या अॅपवर अपलोड करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर अनेकांनी या सोशल मीडिया अकाऊंटविरोधात सायबर पोलिसांत तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी असाच सुल्ली डिल्स (Sulli Deals) नावाचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा दुसरा सुल्ली डिल्स तर नाही ना? असं बोललं जात आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी (Shivsena MP Priyanka Chaturvedi) आक्रमक झाल्या आहेत. पण, हे सुल्ली डिल्स प्रकरण नेमकं काय आहे? ते बघुयात.
या अॅपमध्ये नाव असलेल्या महिलांपैकी एक असलेल्या पत्रकाराने असा दावा केला आहे की गितहबवर 'सुल्ली डील्स' प्रमाणे 'बुल्ली बाई' नावाचा एक गट तयार करण्यात आला आहे. जो जो मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून गोळा करतो आणि फोटोंचा ट्विटरवर लिलाव करतो. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरून या महिलेला पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले आहे.
शिवसेनेच्या प्रियंका चुतर्वेदी काय म्हणाल्या? -
सुल्ली डिल्स प्रकरणाविरोधात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चुतर्वेदी यांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वारंवार तक्रार केली. सुल्ली डिल्ससारख्या अॅपच्या माध्यमातून कुप्रथा आणि सांप्रदायिकतेवरून मुस्लिम महिलांना टार्गेट केलं जातं, असं केंद्रीय मंत्र्यांना सांगितलं. पण, याकडे दुर्लक्ष केले जाते ही लाजीरवाणी बाब आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून दोषींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे, असं प्रियंका चुतर्वेदी म्हणाल्या.
केंद्रीय मंत्र्यानी घेतली दखल -
प्रियंका चुतर्वेदी यांनी केलेल्या ट्विटची दखल केंद्रीय आयटी मंत्री वैष्णव यांनी घेतली असून ते म्हणाले, ''GitHub ने शनिवारी सकाळीच युजर्सला ब्लॉक केले. तसेच याप्रकरणी सीईआरटी आणि पोलिस अधिकारी पुढील कारवाईसाठी प्रयत्न करत आहेत.'' त्यानंतर चतुर्वेदी यांनी देखील वैष्णव यांचे आभार मानले आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी विनंती केली.
#SulliDeals प्रकरण नेमकं काय आहे? -
गेल्या ४ जुलै २०२१ ला अनेक Twitter युजर्सने GitHub वर एका अज्ञात गटाने तयार केलेल्या 'Sulli Deals' नावाच्या अॅपचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. अॅपमध्ये "सुली डील ऑफ द डे" अशी टॅगलाइन होती आणि मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकले होते. तसेच या फोटोंचा लिलाव केला जात होता. 'सुल्ली' हा महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. अॅप बनवणाऱ्याने सोशल मीडिया अकाऊंटवरून मुस्लीम महिलांचे फोटो अवैधरित्या उचलून त्यांना ट्रोल केले. त्यानंतर याच फोटोंचा सुल्ली डिल्सच्या नावाखाली लिलाव करण्यात येत होता. याप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.