Mamata Banerjee Prashant Kishor esakal
देश

गोव्यात ममतांना धक्का; माजी आमदारांसह 5 नेत्यांनी सोडली TMC ची साथ

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा राजकीय धक्का बसलाय.

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना गोव्यात मोठा राजकीय धक्का बसलाय. माजी आमदार लवू मामलातदार (Former MLA Lavu Mamlatdar) यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress Party) पाच नेत्यांनी पक्षाचा नुकताच राजीनामा दिलाय. गोव्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षासोबत आम्हाला राहायचं नाही, असं ममतांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हंटलंय.

लवू मामलातदारांशिवाय राम मांडरेकर, किशोर परवार, कोमल परवार आणि सुजय मलिक यांनीही पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यांनी पत्रात म्हटलंय, आम्ही टीएमसीमध्ये या आशेनं सामील झालो होतो, की हा पक्ष गोवा आणि गोवावासीयांसाठी उज्ज्वल दिवस आणेल; पण टीएमसी गोवा आणि गोव्यातील जनतेला समजून घेऊ शकलेली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. तृणमूल सोडणाऱ्या सदस्यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात ममता बॅनर्जींच्या गोव्यातील निवडणूक (Goa Assembly Election) प्रचारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या नेतृत्वाखालील I-PAC चा संदर्भ देत ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी गोव्यातील तुमच्या प्रचारासाठी ज्या कंपनीला नियुक्त केलंय, ती गोव्यातील जनतेला मूर्ख बनवत आहे, असा आरोप त्यांनी केलाय.

गोव्यात गृहलक्ष्मी योजनेंतर्गत तृणमूलनं राज्यातील प्रत्येक महिलेला दरमहा 5 हजार रुपये देण्याचं वचन दिलंय. मात्र, राजीनामा दिलेल्या सदस्यांनी आरोप केलाय की, गोवा गृहलक्ष्मी योजनेत (Goa Grihalakshmi Yojana) ज्या कंपनीला नियुक्त केलंय, ती फक्त निवडणुकीसाठी फायदा घेताना दिसतेय. टीएमसी सरकार पश्चिम बंगालमधील महिलांचं सक्षमीकरण करण्यात अयशस्वी ठरलंय. आम्हाला वाटत नाही, की ते गोव्यातील आमच्या माता आणि भगिनींसाठी काही चांगलं काम करतील, असंही त्यांनी म्हंटलंय. तृणमूलनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) सुदिंडा धवलीकर यांच्याशी हातमिळवणी करून धर्माच्या आधारे गोव्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही नेत्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT