Shraddha Murder Case Sakal
देश

Shraddha Murder Case : आफताब अन् श्रद्धा भेटलेले Bumble डेटिंग अ‍ॅप किती सुरक्षित

श्रध्दा वायकर हत्याकांडांनंतर डेटिंग अ‍ॅप पुन्हा एकादा चर्चेचा विषय बनला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Murder Case : श्रध्दा वालकर हत्याकांडांनंतर डेटिंग अ‍ॅप पुन्हा एकादा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या घटनेतील मुख्य आरोपी आफताब पूनावाला पोलीसांच्य ताब्यात असून, चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

हेही वाचा : Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

आफताब आणि श्रद्धा वालकर लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आफताबने सहा महिन्यापूर्वी श्रद्धाची हत्या करत तिच्या शरिराचे ३५ तुकडे करत ते जंगलात फेकून दिले.

चौकशीमध्ये आफताब आणि श्रद्धाची ओळख डेटिंग अ‍ॅपवर झाली होती. तो डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक मुलींना भेटत असे. बंबल या नावाच्या डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आफताब आणि श्रद्धा एकमेकांच्या संपर्कात आले होते. भारतात या अ‍ॅपची लोकप्रियता मोठी असून, लाखो लोक याचा वापर करतात.

बंबल हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर 10 दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. प्ले स्टोअऱशिवाय हे अ‍ॅप Apple App Store वरदेखील खूप लोकप्रिय आहे. लाइफस्टाइल कॅटेगरित हे अ‍ॅप पाचव्या क्रमांकावर असून, याबाबत लाखो यूजर्सने रिव्ह्यू लिहले आहेत. अनेकजण टिंडरला पर्याय म्हणूनदेखील हे अ‍ॅप वापरू शकतात.

कधी लॉन्च करण्यात आले अ‍ॅप

बंबल अ‍ॅप 2014 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. हे टिंडर प्रमाणेच वापरले जाते. सर्वात प्रथम यूजरला या अ‍ॅपवर स्वतःचे प्रोफाइल तयार करावे लागते. यासाठी अ‍ॅपद्वारे काही तपशील विचारले जातात.

अ‍ॅपमध्ये आहेत तीन मोड

लोकप्रिय बंबल अ‍ॅपवर तीन मोड आहेत. यामध्ये एक मोड डेटिंगसाठी, दुसरा मैत्रीसाठी आणि एक बिझनेस नेटवर्किंगसाठी देण्यात आला आहे. यूजर त्याच्या गरजेनुसार यातील एका मोडची निवड करू शकतो. यानंतर अनेक प्रोफाईल यूजर्सच्या समोर येतात.

यूजर जर मॅचिंग करण्यात इंट्रेसट्रेड असेल तर, तो उजवीकडे स्वाइप करतो आणि तसे नसल्यास यूजर डावीकडे स्वाइप करू शकतो. यूजरने ज्या व्यक्तीवा राईट स्वाइप केले आहे, त्यानेदेखील संबंधित यूजरच्या राईटला स्वाइप केले तर, त्याला नोटिफिकेशन मिळते. यानंतर यूजर्स एकमेकांशी चॅट करू शकतात.

केवळ महिलाच करू शकतात पहिला मेसेज

कंपनी फी घेऊन युजरचे प्रोफाईल बूस्ट करते. असे केल्याने यूजरचे प्रोफाइल अधिक लोकांना हायलाइट होते. बूस्ट करण्याचे चार्जेच वेगवेगळे असतात. या अ‍ॅपची खासियत म्हणजे चॅटिंगदरम्यान पहिला मेसेज फक्त महिलाच करू शकतात. या एकाच कारणामुळे या अ‍ॅपला फेमिनिस्ट डेटिंग अ‍ॅपदेखील म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT