श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले.
Shraddha Walkar Murder Case : दिल्लीत वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) या 26 वर्षीय तरुणीची प्रियकरानं अतिशय क्रुरतेनं हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनं सर्वत्र खळबळ उडालीय. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आफताब अमीन पूनावाला (Aftab Amin Poonawala) असं या घटनेतील आरोपी असणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्यानं श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. फ्रिजमध्ये हे शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्यानं रचला होता. हत्याकांड झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतलंय. या घटनेवरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी टीका केलीय.
एका हिंदू तरुणीची नृशंसपणे हत्या केली गेली, तिच्या शरीराचे तुकडे केले गेले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सिंह म्हणाले आहेत. देशातील मुसलमानांकडून लव्ह जिहाद चालवला जात असल्याचं सिंह यांनी म्हटलंय. कट रचून मुस्लिम तरुण (Muslim Youth) हिंदू तरुणींना (Hindu Girl) आपल्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांना सोडून देतात किंवा तिची तुकडे-तुकडे करून हत्या करतात, असा आरोपही सिंह यांनी केलाय.
श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताब पूनावाला याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीत रोज नवनवे खुलासे होत आहेत. श्रद्धा आणि आफताब हे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात होते आणि दोघांमधले वाद टोकाला पोहोचले होते. या वादामुळं आफताबनं श्रद्धाची हत्या केली होती आणि तिच्या शरीराचे जवळपास 35 तुकडे केले होते. यातले काही तुकडे त्याने फ्रीजमध्ये लपवले होते. श्रद्धाला ठार मारल्यानंतर आफताबनं नवी गर्लफ्रेंडही शोधली होती. श्रद्धा आणि आफताब यांची बंबल नावाच्या डेटींग अॅपवर ओळख झाली होती.
श्रद्धाला ठार मारल्यानंतर याच अॅपवरून आफताबनं नवीन गर्लफ्रेंड शोधली होती. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्यानंतर आफताब गुडगावमधल्या एका कॉल सेंटरमध्ये कामाला लागला होता. श्रद्धाला भेटल्यानंतर आफताबनं बंबल हे डेटींग अॅप डिलीट केलं होतं, ते त्यानं पुन्हा मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं होतं. या अॅपवर त्याची एका तरुणीशी ओळख झाली होती आणि ही तरुणी त्याच्या घरी देखील येऊन गेली होती अशी माहिती पोलिसांना प्राथमिक तपासात कळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.