Shraddha Walkar Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case : प्रेयसीच्या शरीराचे 35 तुकडे करुन हत्या; पोलिसांना हवेत 'हे' 7 पुरावे

चौकशीदरम्यान आफताब काही सांगत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. आफताब पोलिसांची दिशाभूल करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

चौकशीदरम्यान आफताब काही सांगत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. आफताब पोलिसांची दिशाभूल करत आहे.

Shraddha Walkar Murder Case : दिल्ली पोलीस (Delhi Police) श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासात गुंतलं आहे. मात्र, आतापर्यंत त्यांच्या हाती कोणताही महत्त्वाचा पुरावा लागलेला नाहीये. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्यासाठी मेहरौलीच्या जंगलात पुन्हा शोधमोहीम राबवली जात आहे.

त्याचबरोबर आरोपी आफताब पूनावालाच्या (Aftab Poonawalla) फ्लॅटचीही झडती घेण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले नाहीत. पोलिसांना श्रद्धाचा मोबाईल किंवा हत्येत वापरलेले हत्यार सापडलेलं नाहीये. आता त्या भागातील कचरा कोठे टाकला जातो, याची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

चौकशीदरम्यान आफताबही काही सांगत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढलीय. आफताब केवळ दिशाभूल करताना दिसत आहे. पोलिसांनी त्याला अनेकवेळा मेहरौलीच्या जंगलात नेलं, तिथं त्यानं मृतदेहाचे तुकडे फेकले. परंतु, श्रद्धाचे डोके अद्याप मिळालेले नाहीये. अशा स्थितीत पोलिसांसमोर मोठं आव्हान असून श्रद्धाच्या हत्येमध्ये वापरलेलं हत्यार, तिचं डोकं, मोबाईल आणि इतर पुरावे मिळतील, तेव्हाच पोलिस आरोपी आफताबविरुद्ध न्यायालयात आपली भूमिका ठामपणे मांडू शकतात.

पोलिसांना कोणते पुरावे हवे आहेत?

शस्त्राचा शोध - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रध्दाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. यानंतर आफताबनं तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. शरीराचे अवयव करवतीनं कापण्यात आले आहेत. सध्या तरी पोलिसांना हे शस्त्र जप्त करण्यात यश आलेलं नाही. चौकशीत आरोपीनं हे हत्यार एमसीडीच्या कचरा व्हॅनमध्ये फेकल्याचं सांगितलं.

श्रद्धाचा मोबाईल - महत्त्वाचा पुरावा असलेला श्रद्धाचा मोबाईल फोन पोलिसांनी अद्याप जप्त केलेला नाहीये. मृत व्यक्तीचं स्थान आणि कालमर्यादा सिद्ध करण्यात मोबाईल महत्त्वाचा ठरतो. श्रद्धाचा मोबाईल कधी महाराष्ट्रात फेकल्याचं आफताब सांगतो तर कधी दिल्लीत.

श्रद्धाचे कपडे - घटनेच्या वेळी आफताबनं घातलेले कपडे अद्याप मिळालेले नाहीत. त्या कपड्यांवरून पोलिसांना श्रद्धाच्या रक्ताच्या खुणांचा पुरावा मिळू शकतो. तेही त्यानं डस्टबिनमध्ये फेकल्याचा आफताबचा दावा आहे. पोलिसांना श्रद्धा किंवा आफताबचे कपडे मिळाल्यास मोठा सुगावा लागू शकतो. यामुळंच पोलीस कचराकुंडीचा तपास करणार आहेत. फॉरेन्सिक अहवालही अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.

फ्रीजवर रक्ताचे डाग - पोलिसांना फ्रीजवरही रक्ताचे डाग आढळले नाहीत, तरीही एफएसएल टीम प्रयत्न करत आहे.

सीसीटीव्ही फुटेज - सीसीटीव्हीमध्ये आफताबचे कोणतेही फुटेज आढळले नाहीत. कारण, त्यानं ही घटना 6 महिन्यांपूर्वी केली होती. सीसीटीव्हीचा फक्त 15 दिवसांचा बॅकअप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT