मागील काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पाकिस्तानला लागून असणाऱ्या सांबा येथे एका सभेत ते नागरिकांशी संवाद साधणार होते. दरम्यान, सांबा येथील पल्ली गावात स्फोटके सापडली होती. मात्र पंतप्रधानांच्या त्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून बऱ्याचदा निर्भयपणे जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहेत. दिवाळीनिमित्त ते सैनिकांसोबत आनंद साजरा करण्यासाठी बॉर्डरवर गेले होते. देशात केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे वर्चस्व होते. मात्र असे असतानाही मोदींनी घोषणा केल्यानंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावला गेला होता.
श्रीनगरच्या लाल चौकात सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी १९९२ मध्ये दहशतवादाला आव्हान देत तिरंगा फडकावला होता. या दहशतवादी खोऱ्यात दिवसाढवळ्या कोणाचेही अपहरण केले जात होते. त्यावेळी कुणालाही जिवे मारले जात होते. दहशतवादाच्या याच काळात मोदींनी श्रीनगरच्या लाल चौकात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत तिरंगा फडकावला होता.
१९९२ साली श्रीनगरच्या लाल चौकात पहिल्यांदा फुटीरतावादी, दहशतवादी आणि स्थानिक नेत्यांना आव्हान देत नरेंद्र मोदींनी हे कार्य केले होते. वास्तविक, भाजपने कन्याकुमारीतून एकता यात्रा सुरू केली होती. याआधी २६ जानेवारी १९९२ रोजी लाल चौकात तिरंगा फडकवण्याची घोषणा करून दहशतवाद्यांना खुले आव्हान दिले आणि तिरंग्याचे पूजन केले होते.
मोदींसह भाजप नेत्यांना लक्ष्य करून रॉकेट डागण्यात आले होते. पंतप्रधान मोदी श्रीनगरला पोहोचण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी पोलिस मुख्यालयावर ग्रेनेड डागला होता. या घटनेते त्यावेळेचे पोलिस महासंचालक जे. एन. सक्सेना गंभीर जखमी झाले होते. तिरंगा फडकवताना दहशतवाद्यांनी रॅकेटही डागले होते. तिरंगा फडकवल्यानंतर मुरली मनोहर जोशी आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे सर्व नेते काश्मीरमधून सुखरूप परतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.